''मौका भी है और कानून भी,'' असं मुंबई ट्रॅफिक पोलीस का म्हणाले?

''मौका भी है और कानून भी,'' असं मुंबई ट्रॅफिक पोलीस का म्हणाले?
पोलिसांनी केलेला रिप्लायMumbai Tak

ट्रॅफिक पोलिसांनी ट्विटरवर दिलेल्या एका रिप्लायची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याचं झालं असं की, मुंबई मॅटर्झ या ट्विटर अकाऊंट मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि मुंबई ट्रॅफिक पोलीस यांना टॅग करत एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्याने बाईकवर बसून मुलासोबत सेल्फी काढणाऱ्या व्याक्तीचा फोटो टाकला आहे. पोलिसांना कोणीही घाबरत नाही आणि त्यांचा आदरही करत नाही. “माहीमच्या टीएच कटारिया मार्गावर चुकीच्या दिशेने MH01DC4597 या हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराने रस्ता सोडण्यास नकार दिला आणि ‘बुलाओ पोलिस को…’ म्हणत हसून सेल्फी घेण्यास सुरुवात केली.” असे मुंबई मॅटर्झ या अकांउटवरुन ट्विट करण्यात आले.

यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी तातडीने रिप्लाय दिला. तो रिप्लाय देखील भन्नाट होता. ''आता यांनी बोलावलं आहे तर जावंच लागेल, मौकाभी है, कानून भी है आणि चलन त्यांना लवकर मिळेल, रिप्लाय या ट्विटला करण्यात आला आहे.'' त्यामुळे या रिप्लायची चर्चा ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यावर अनेकांनी पोलिसांच्या समर्थनार्थ आणि काहींनी विरोधात पोस्ट केल्या आहेत. पोलिसांकडून इतक्या तातडीने प्रतिसाद देण्यात आला, याचं अनेकांनी कौतुक केलं.

तर बाईकवर बसलेला व्यक्ती हा सुरू असलेल्या गाडीवर बसलेला नाही, त्यामुळे बंद गाडीवर बसण्यासाठी हेल्मेटची गरज लागत नाही, असं एकाने रिप्लाय केला आहे. तर एकाने लिहलंय की, थांबलेल्या गाडीवर सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई केली जाते. फेरीवाले आर्धा रस्ता ब्लॉक करतात मात्र, त्यांच्या कोणतीही कारवाई केली जात नाही. कधी मुंबईतल्या बांद्रा भागात येऊन पहा, तिथे ट्रिपल सीट बसून काही मुलं झिगझॅग पद्धतीने गाडी चालवात, वाहतूक पोलीस त्यांना अडवत नाहीत जसे काही ते पोलिसांसाठी ते अदृष्य आहेत, अशी एकाने खोचक कमेंट केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in