12 नोव्हेंबरच्या अमरावती हिंसाचाराबाबत राज्य सरकारने मौन का बाळगलं आहे?-फडणवीस

अमरावती मध्ये देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
12 नोव्हेंबरच्या अमरावती हिंसाचाराबाबत राज्य सरकारने मौन का बाळगलं आहे?-फडणवीस
देवेंद्र फडणवीसफोटो सौजन्य : Twitter

अमरावतीत जो हिंसाचार झाला ती घटना दु्र्दैवी आहे. 12 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो मोर्चा चुकीच्या माहितीतून काढला गेला. त्रिपुरामधे जे घडलंच नाही ते झाल्याचं दाखवून हा हिंसाचार घडवण्यात आला. जी घटना घडलीच नाही घडल्याचं दाखवून अल्पसंख्याक समाजाच्या भावना भडकवण्यात आल्या. महाराष्ट्रात अराजकता तयार झाली पाहिजे, दंगे झाले पाहिजेत अशा मानसिकतेततून तयार केलेला कट होता का? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता देवेंद्र फडणवीस यांनी केली. 12 तारखेला जे काही घडलं, जो हिंसाचार झाला त्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प का बसलं आहे?

अमरावती शहरात दगडफेक करताना समाजकंटक.
अमरावती शहरात दगडफेक करताना समाजकंटक.

12 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो कुणाच्या परवानगीने निघाला? किती लोकांना संमती दिली होती? का परवानगी देण्यात आली होती? हे सगळं स्पष्ट झालं पाहिजे. सरकारने ते सांगितलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा मोर्चा परतत असताना जे काही घडलं ते दंगे, हिंसाचार घडावा या उद्देशाने केलं गेलं. विशिष्ट धर्माच्या लोकांची दुकानं फोडण्यात आली. आता राज्यकर्ते १२ तारखेची घटना पुसून टाकण्याचा प्रयत्न करून 13 तारखेला जे घडलं तेच सांगत आहेत. 13 तारखेला घडलेली घटना ही देखील चुकीचीच होती. आम्ही हिंसाचाराचं समर्थन करत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

चुकीच्या घटनेसाठी जर लांगुलचालन होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आधी न घडलेल्या घटनेवरून हिंसा घडवून आणायची दुसऱ्या दिवशी त्याची रिअॅक्शन आल्यानंतर फक्त दुसरा दिवस काय घडलं तेच बघायचं. हे चालणार नाही. जे लोक या हिंसाचारात नव्हतं त्यांनाही यात गोवण्यात येतं आहे. एका महिलेने मला सांगितलं की माझा मुलगा फक्त गाडी घराच्या आतमधे घेऊन येत होता. मात्र नंतर त्याला नेऊन त्याच्यावर कलम 307 लावण्यात आलं. हा इतका मोठा गुन्हा होता का? हे न तपासता त्याला अटक झाली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये अडकवलं जातं आहे. टार्गेट करून आणि याद्या तयार करून तरूणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस
अमरावती हिंसाचार प्रकरणी धरपकड; 100 हून अधिक जणांना अटक, संचारबंदी अंशतः शिथिल

12 नोव्हेंबरची घटना डिलिट करून 13 तारखेच्या घटनेत जे लोक सहभागी झाले तेवढंच पाहिलं जातं आहे. जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे.राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत. त्यामुळे या कारवाईचा आम्हाला निषेधही करावा लागेल. जर अशीच कारवाई होत राहिली तर भाजपचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते जेलभरो आंदोलन करतील.

आम्ही हनुमान नगर या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी असलेल्या महिला प्रचंड दहशतीत आहेत. मी तसं निवेदन पोलीस प्रशासनाकडे दिलं आहे. फक्त 13 ताऱखेवरचं फोकस केला तर ते योग्य ठरणार नाही. हे सगळं षडयंत्र राज्य सरकारने बाहेर काढलं पाहिजे. १२ तारखेचं षडयंत्र रचणाऱ्यांबाबत राज्य सरकार मूग गिळून का गप्प बसलं आहे? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in