85 व्या वर्षी वडिलांनी विवाह मंडळात नाव नोंदवलं म्हणून मुलाने वरवंटा डोक्यात घालून केलं ठार

पुण्यातल्या हत्येच्या घटनेचं कारण आलं समोर
 85 व्या वर्षी वडिलांनी विवाह मंडळात नाव नोंदवलं म्हणून मुलाने वरवंटा डोक्यात घालून केलं ठार

स्मिता शिंदे, प्रतिनिधी, खेड

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर भागात मुलाने वडिलांचा सुरीचे वार करून आणि डोक्यात वरंवटा घालून खून केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की आपल्या वृद्ध वडिलांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने याबत जर समाजात समजले तर आपला अपमान होईल. तसेच प्रॉपर्टी मध्ये हिस्सेदार होईल या रागात मुलाने थेट वडिलांच्या गळ्यावर कांदा कापण्याची सुरी चालवली.

 85 व्या वर्षी वडिलांनी विवाह मंडळात नाव नोंदवलं म्हणून मुलाने वरवंटा डोक्यात घालून केलं ठार
Crime: देहविक्रीसाठी आईने 5 वर्षाच्या मुलीला विकलं, नराधमाकडून बलात्कारनंतर चिमुकलीची हत्या

बोथट सुरीने गळा कापेना म्हणून मुलाने घरातील दगडी वरवंटा तोंडावर, डोक्यावर हाणून वडिलांना संपवले. शिवाय या मुलाने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन या गुन्ह्याची माहिती देत तो फिर्यादी झाला. खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरात गुरुवारी 6 जानेवारीला सायंकाळी नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली आहे..शंकर रामभाउ बोऱ्हाडे (वय- 85 वर्ष) असे मयत वडिलांचे नाव आहे.तर शेखर शंकर बो-हाडे, वय 47, रा. नंदादिप हौसिंग सोसायटी, बी विंग, फलॅट नंबर 9, वैशंपायन आळी, राजगुरूनगर ता. खेड असे आरोपी मुलाचे नाव आहे.

आरोपी मुलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार माझे वडील शंकर रामभाउ बोऱ्हाडे, वय- 85 वर्षे, हे माझे परस्पर वधु - वर सुचक मंडळात पैसे भरून स्वतःचे लग्नाची नोंदणी करून देखील माझेशी खोटे बोलले. याचा राग मला अनावर झाल्याने मी किचन रूममधील कांदा कापण्याची सुरी हातात घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. म्हणुन मी घरात असलेल्या दगडी वरवंटयाने तोंडावर व डोक्यात मारून त्यास जिवे ठार मारून खुन केला आहे. वारंवार सुरीला धार लावून गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे.असे म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव हे करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून जन्मदात्या आईची हत्या करून वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुण्यातल्या इंदापूरमध्ये उघडकीस आली होती. आई वडील हे मागितलेले पैसे देत नाहीत या कारणाने हा हल्ला करण्यात आला होता असा आऱोप झाला होता.

पुण्यातल्या धनकवडी भागात 42 वर्षांच्या एका माणसाने प्लास्टिकच्या पिशवीत डोकं घालून आईचा जीव घेतला. श्वास गुदमरल्याने या महिलेला प्राण गमवावे लागले. नव्या वर्षाच्या पहिल्या सात दिवसात जन्मदात्यांच्या हत्येच्या तीन वेगळ्या घटनांनी पुणे शहर हादरलं आहे. पुणे शहरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in