Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' देण्यावरून का झाला होता वाद, कोणी केला होता विरोध?

Babasaheb Purandare Maharashtra Bhushan controversy: बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 साली महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. जाणून घ्या त्याविषयी सविस्तरपणे.
Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' देण्यावरून का झाला होता वाद, कोणी केला होता विरोध?
why was there controversy over giving maharashtra bhushan to Babasaheb Purandare who protested pune ncp jitendra awhad(फाइल फोटो, सौजन्य: Facebook)

पुणे: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचली आहेत. त्यामुळेच ते महाराष्ट्रात शिवशाहीर म्हणून ओळखले जातात. यामुळेच 2015 साली तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' प्रदान केला होता. पण त्यावेळी यावरुन बराच गदारोळ झाला होता. या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देखील ढवळून निघालं होतं.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. दरम्यान, त्यांना हा पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी थेट कोर्टात याचिका देखील करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ती याचिका देखील फेटाळून लावली होती. ज्यानंतर त्यांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या आधी साहित्यिक पु.ल. देशपांडे, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि गायक पं.भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जनतेपर्यंत पोहचविल्याबद्दल शिवचरित्राचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. परंतु, पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्यास राज्यातील काही संघटनांनी विरोध केला होता.

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्यावरुन काय झाला होता वाद?

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र आणि जीवनावर वादग्रस्त लिखाण केलं आहे असा काही संघटना आणि राजकीय पक्षाने आतापर्यंत अनेकदा आरोप करण्यात आला आहे.

त्यांच्यावर असा देखील आरोप आहे की, शिवरायांचे गुरू म्हणवल्या जाणाऱ्या दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल त्यांनी आपल्या पुस्तकातून खोटी माहिती दिली.

त्यांच्यावर असाही आरोप करण्यात आला होता की, त्यांनी जे लिहिलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजी महाराज आणि आई जिजाबाई यांच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये यासाठी विरोध दर्शविण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पुरस्काराला प्रचंड विरोध केला होता.

'ज्यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊंची बदनामी केली, इतिहासाचे विकृतीकरण केले त्यांच्या लिखाणाला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या निमित्ताने राजमान्यता मिळणार आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे.' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुरंदरेंच्या या पुरस्कार सोहळ्याला विरोध दर्शवला होता.

'त्या' वादामागे नेमका राजकीय विरोध काय होता?

बाबासाहेब पुरंदरे यांच्या समर्थकांनी त्यावेळी असं म्हटलं होतं की, बाबासाहेब हे केवळ ब्राम्हण असल्यानेच त्यांच्या या पुरस्कारला विरोध केला जात आहे. त्यांच्या समर्थकांचं मते बाबासाहेब यांचं शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

मात्र, या सन्मानाला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या चुकीच्या गोष्टी हेच निषेधाचे कारण आहे.

कोणी-कोणी केला होता बाबासाहेबांना विरोध?

पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेड, काही साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता.

कोणी-कोणी केलं होतं पुरस्काराचं समर्थन?

बाबासाहेब पुरंदरे यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि काही साहित्यिक आणि इतिहासकार यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर त्यावेळी बाबासाहेबांच्या पुरस्काराला विरोध करणाऱ्यांबाबत अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती.

why was there controversy over giving maharashtra bhushan to Babasaheb Purandare who protested pune ncp jitendra awhad
Babasaheb Purandare passed away: शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड, बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात निधन

दरम्यान, 19 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांना राजभवनातील दरबार हॉलमध्येच पुरस्कार बहाल करण्यात आला होता.

या पुरस्कारानंतर साधारण चार वर्षांनी म्हणजे 2019 साली भारतातील दुसऱ्या क्रमांकाच सर्वोच्च पुरस्कार पद्मविभूषण देखील जाहीर झाला होता. त्यावेळी देखील जितेंद्र आव्हाड यांनी त्याला प्रचंड विरोध केला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in