Facebook Server Down: Whatsapp, Facebook आणि Instagram बंद का पडलं होतं?

Facebook Server Down: Whatsapp, Facebook आणि Instagram हे सोशल प्लॅटफॉर्म तब्बल 6 तासांहून अधिक वेळ बंद होतं. हे नेमकं का बंद झालं असावं याबाबत आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
Facebook Server Down: Whatsapp, Facebook आणि Instagram बंद का पडलं होतं?
Why Whatsapp Facebook and Instagram down what is the actual reason

Facebook, Instagram, WhatsApp आणि Oculus या सोशल वेबसाइट आणि अॅप हे अनेक तास बंद होते. यामुळे, यूजर्संना रात्रभर अॅक्सेस करता येत नव्हतं. पण आता सकाळपासून हे अॅप्स आणि वेबसाइट पुन्हा सुरु झाले आहेत. पण हा एक मोठा ग्लोबल आउटेज असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, फेसबुकने या डाऊनचं नेमकं कारण अद्याप देण्यात आलेलं नाही.

Facebook का झालं असावं डाऊन?

दरम्यान, फेसबुकसारख्या एवढ्या मोठ्या कंपनीला अशाप्रकारच्या संकटाला का तोंड द्यावं लागलं याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यापैकी एक कारण म्हणजे डोमेन नेम सिस्टम (DNS) असल्याचं बोललं जात आहे. DNS ला इंटरनेटचं फोनबुक असेही म्हणतात. जेव्हा यूजर्स एखादं होस्ट नेम म्हणजे जसं की, facebook.com जेव्हा URL मध्ये टाइप करतो तेव्हा DNS त्याला IP अॅड्रेसमध्ये रूपांतरित करते. IP अॅड्रेस म्हणजे जिथे साइट असते.

याशिवाय BGP (Border Gateway Protocol) देखील वेबसाइट डाऊन होण्यामागचं कारण सांगितलं जात आहे. BGP मध्ये IP अॅड्रेस आणि DNS नेमसर्व्हर रुट होतं. असं समजा की, जर DNS हे इंटरनेटचे फोनबुक आहे तर BGP ही त्याची नेव्हिगेशन सिस्टम आहे.

BGP ठरवते की, कोणत्या रुटचा डेटा हा सर्वात वेगाने पोहचेल. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की, अशीच चूक फेसबुकच्या बाबतीत झाली. DNS रिझोल्यूशन अयशस्वी झाल्यामुळे यूजर्स हे फेसबुकमध्ये अॅक्सेस करु शकत नव्हते. इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे Cloudflare चे CTO John Graham-Cumming यांच्या मते, फेसबुकने आपल्या राऊटरमध्ये असे काही केलेले असावे की, ज्यामुळे फेसबुकचे नेटवर्क उर्वरित इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकत नव्हतं.

दरम्यान, हे सर्व केवळ वेगवेगळे अंदाज आहेत. जोपर्यंत कंपनी याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगत नाही तोवर त्याबद्दल अचूक माहिती उपलब्ध होणार नाही. फेसबुकने अद्याप या समस्येबद्दल अधिकृतरित्या काहीही सांगितले नाही.

Why Whatsapp Facebook and Instagram down what is the actual reason
Facebook Down: झुकरबर्गला 'एवढ्या' हजार कोटींचे नुकसान, Facbook-Whatsapp ला झालेलं तरी काय?

झुकरबर्गने मागितली यूजर्सची माफी

दरम्यान, या सगळ्या प्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनेही फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. यावेळी खंडित झालेली सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 'फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा सुरु झाल्या आहेत. सेवेत खंड पडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला कल्पना आहे की, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात', असं मार्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण याव्यतिरिक्त त्याने बिघाड होण्याचं नेमकं कारण काय आहे हे मात्र सांगितलेलं नाही.

Related Stories

No stories found.