Aniket Vishwasrao: अभिनेता अनिकेत विश्वासराविरोधात पत्नीचा गंभीर आरोप, पुणे पोलिसात गुन्हा दाखल

Marathi actor Aniket Vishwasrao: अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात त्याची पत्नी स्नेहा हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
wife complaint against marathi actor aniket vishwasrao filed case of domestic violence and assault
wife complaint against marathi actor aniket vishwasrao filed case of domestic violence and assault(फाइल फोटो, सौजन्य: Facebook)

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) याच्याविरोधात त्याची पत्नी स्नेहा विश्वासराव (Sneha Vishwasrao) हिने कौटुंबिक हिंसाचार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (Pune Crime) याचवेळी स्नेहाने आपल्या सासू-सासऱ्यांविरोधात देखील तक्रार केली आहे. याचप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आल्याने मराठी सिनेसृष्टीत मात्र एकच खळबळ उडाली आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात सून स्नेहा विश्वासराव हिने कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल. या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी स्नेहा विश्वासराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनीही साथ दिल्याचं स्नेहाने तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, आता याच तक्रारीच्या आधारावर पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

(फाइल फोटो, सौजन्य: Instagram)

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा विवाह 2018 साली झाला होता. स्नेहा ही देखील अभिनेत्री असून तिने काही मालिका आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अनिकेत सतत छळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप स्नेहाने आपल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांकडून अनिकेतवर नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, याप्रकरणी अनिकेत विश्वासरावचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा 'मुंबई तक'च्या प्रतिनिधीने प्रयत्न केला असताना अद्याप त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात त्याची बाजू सध्या तरी समोर येऊ शकलेली नाही.

wife complaint against marathi actor aniket vishwasrao filed case of domestic violence and assault
पूनम पांडेला पती सॅम बॉम्बेकडून मारहाण, मुंबई पोलिसांनी केली अटक; पूनम पांडे रूग्णालयात

कोण आहे अनिकेत विश्वासराव?

मराठी सृष्टीतील चॉकलेट हिरो अशी अनिकेत विश्वासराव ओळख आहे. छोट्या पडद्यावरील 'नायक' या मालिकेतून तो सगळ्यात आधी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती ऊन पाऊस आणि कळत नकळत या मालिकेतून. मात्र, अनिकेत यानंतर मालिका विश्व सोडून मोठ्या पडद्याकडे वळला.

पोश्टर बॉईज, फक्त लढ म्हणा, आंधळी कोशिंबीर, ये रे ये रे पैसा, लपून छपून, बस स्टॉप, पोश्टर गर्ल या सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये अनिकेतनं काम केलं. दरम्यान, 2018 साली अनिकेतने अभिनेत्री स्रेहा चव्हाणसोबत लग्न केलं. त्याआधी अनिकेत काही अभिनेत्रींना डेट करत असल्याची बरीच चर्चा होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in