'माझी बायको शारीरिक संबंध ठेवत लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवते', पतीची पोलिसात तक्रार

Noida Crime: पत्नी डेटिंग अॅपच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार संबंधित महिलेच्या पतीनेच पोलिसांना दिली आहे.
'माझी बायको शारीरिक संबंध ठेवत लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवते', पतीची पोलिसात तक्रार
wife physical relationship honeytrap blackmail money husband registered police case noida police station crime(प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Getty)

नोएडा: राजधानी दिल्लीजवळील नोएडातील एका पोलीस ठाण्यात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका तरुणाने पोलीस ठाण्यात येऊन पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या पत्नीच्या वागण्याकडे बोट दाखवत, तरुणाने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी भोळ्या लोकांना हनी-ट्रॅपमध्ये अडकवते आणि ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळते. एवढेच नाही तर तिने आतापर्यंत अनेकांना हनी ट्रॅपचा शिकार बनवले आहे.

तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्या पत्नीविरुद्ध सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एफआयआर देखील दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत.

परस्पर संमतीने लैंगिक संबंध, नंतर...

गौतम बुद्ध नगरमधील डीसीपी महिला सुरक्षा वृंदा शुक्ला यांनीही या प्रकरणाची पुष्टी करताना सांगितले की, सेक्टर 41 मध्ये राहणारे दीपक कुमार यांनीही अशाच प्रकारची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, शोभा (नाव बदलले आहे) नावाच्या महिलेसोबत एका डेटिंग अॅपवर त्यांची ओळख झाली होती.

शोभाने अॅपवर 'सिंगल' असं स्टेट्स ठेवून रजिस्ट्रेशन केलं होतं. यावेळी दोघांचं बोलणं झाले आणि शोभाने त्याला ओखला येथे भेटायला बोलावलं. याच भेटीदरम्यान दोघांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध निर्माण झाले.

यावेळी आरोप करताना दीपकने असेही सांगितले की, त्यानंतर त्याला ब्लॅकमेल केले जाऊ लागले. एवढेच नाही तर त्याच्याकडून मोठ्या रकमेचीही मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास दीपकला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. यामुळे दीपकने दबावाखाली येऊन महिलेशी लग्न केले. पण जेव्हा दीपकने चौकशी केली तेव्हा त्याला कळले की शोभा (नाव बदलले आहे) ही आधीच विवाहित आहे. परंतु सोशल मीडियावर ती स्वतःला अविवाहित असल्याचे सांगते.

लग्नानंतरही पत्नी अनेक लोकांना करत होती ब्लॅकमेल

दरम्यान, एफआयआरमध्ये असाही आरोप करण्यात आला आहे की, ही महिला लग्नानंतरही याच पद्धती ब्लॅकमेलिंग करत आहे. डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून ती मुलांशी मैत्री करुन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवते. त्यानंतर ती त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवते आणि नंतर याप्रकारणी संबंधित तरुणाला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करते.

wife physical relationship honeytrap blackmail money husband registered police case noida police station crime
अनैतिक संबंध, विवाहित प्रेयसी अन् एका हत्येचा 'विषारी' कट!

अखेर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आता पोलीस संबंधित महिलेचा शोध घेत आहेत. तसेच काही पीडित लोकांशीही पोलीस आता संपर्क साधत आहेत. मात्र, सध्या आरोपी महिलेबाबात अद्याप तरी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून आरोपी महिलेचा कसून शोध सुरु आहे. याशिवाय हे ब्लॅकमेलिंग फक्त पैशासाठीचं केलं जात आहे की, यामागे आणखीही काही कारण आहे याबाबातही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in