'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळ्यात नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार?

कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर रंगते आहे चर्चा
'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळ्यात नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार?

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. 11 एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, येत्या 24 एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत.

'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळ्यात नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार?
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे जेव्हा भेटतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार, तसंच लता मंगेशकरांच्या नावाने त्यांना पुरस्कार मिळणार आहे. हा इतका मोठा सोहळा मुंबईत असताना. षण्मुखानंद सभागृहात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर पुन्हा एकत्र येणार का? याविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(फाइल फोटो - सौजन्य CMO)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार म्हटल्यावर राजकीय वर्तुळापासून सोशल मीडियावर मोदी ठाकरे एकत्र येणार का? याविषयी चर्चा आता जोरात आहेत.. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात रविवारी २४ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळा होणार आहे. नुकतंच भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं. लता मंगेशकरांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांकडून दिला जाणारा दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळा होणार आहे. यावर्षीपासून याच स्मृती पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकर विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. आणि हा पहिलाच पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोंदींना जाहीर झाला आहे. आणि दिदींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मी स्वीकारणार आहे आणि पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं नक्की केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदीफोटो-इंडिया टुडे

दरम्यान, 24 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काश्मीरमधला नियोजित कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान काश्मीरवरून मुंबईत येणार आहेत. या नियोजित काश्मीर दौऱ्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील का याबद्दल साशंकता होती मात्र पंतप्रधान कार्यालयाने हे स्पष्ट केलं आहे की काश्मीरचा नियोजित दौरा करून काश्मीरवरून नरेंद्र मोदी संध्याकाळी थेट मुंबईला या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत..

लता मंगेशकर
लता मंगेशकरफोटो-इंडिया टुडे

सध्या केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलंच द्वंद्वं सुरू आहे.. ईडीच्या वाढलेल्या कारवायांवरून आधीच केंद्रात आणि राज्यात धुसफुस सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमात मोदी आणि ठाकरे एकत्र आले तर काय बोलणं होणार, भाषणात दोघं काय बोलतील यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला येणार आहेत का याविषयी मुंबई तकने मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क साधला असता त्यांच्याकडून असं उत्तर मिळालं की या कार्यक्रमाचं आमंत्रण अजूनतरी मंगेशकर कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं नाही, हा सरकारी सोहळा नसून, मंगेशकर कुटुंबियांनी स्थापन केलेल्या दिनानाथ मंगेशकर ट्रस्ट या खाजगी संस्थेनेकडून हा कार्यक्रम होणार आहे. सरकारी सोहळा असता तर प्रोटोकोलनुसार मुख्यमंत्र्यांना या सोहळ्याला उपस्थित राहावं लागलं असतं मात्र हा खासगी सोहळा असल्याने आणि कोणताही प्रोटोकॉल नसल्याने या सोहळ्याला मुख्यंमत्र्यांना उपस्थित राहावंच लागेल अशी सक्ती नाही.. मात्र अजूनतरी २४ एप्रिलच्या सोहळ्याचं आमंत्रण मंगेशकर कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं नाही असं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना निमंत्रण मिळालं तरच उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिलला मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील.. तोवर ठाकरे आणि मोदी एकाच मंचावर या चर्चाच सुरूच राहतील.

Related Stories

No stories found.