Covid 19: महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले...

कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असंही अजितदादांनी म्हटलं आहे
Covid 19: महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले...

कोरोनाचे रूग्ण वाढू लागले तर निर्बंध कठोर करावेच लागतील. पुण्यात, मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. हे काही फारसं चांगलं लक्षण नाही. अख्खी कुटुंबच्या कुटुंबं कोरोना बाधित होत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटची तीव्रता कदाचित कमी असेल पण तो शेवटी कोरोनाच आहे त्यामुळे कठोर निर्बंध लावावेच लागतील असं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात म्हटलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

Covid 19: महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले...
सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळेंना कोरोनाची लागण, सोशल मीडियावरून दिली माहिती

आणखी काय म्हणाले आहेत अजित पवार?

मुंबईसह राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही केले. ते म्हणाले, ‘सुप्रियाच्या तर सगळ्या घराला कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही अनेक लोक मास्क न घालता फिरतायत. बाबांनो माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मी सभागृहात आल्यापासून ते घरी जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलतानाही काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहेत. आपणच नियम पाळणार नाही तर नियम सांगण्याचा अधिकार मला नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत बाहेर न करता, घरातच करा.’

Covid 19: महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले...
महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेनं?, सेलिब्रेशनच्या उत्साहावर निर्बंधांचं विरजण, नियमावली जाहीर

यावेळीचा कोरोनाचा संसर्ग आहे तो झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. आत्ता जो ओमिक्रॉनचा विषाणू आढळतो आहे. तो शोधण्यासाठी वेगळ्या लॅब निर्माण करायच्या का? किंवा आहे त्या लॅबमध्ये तशी व्यवस्था करायची का याची चर्चा आम्ही करतो आहोत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही अजित पवारांनी सांगितलं.

लग्नसमारंभाचे कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम या सगळ्यांना राजकीयच लोक गर्दी करत आहेत असं नाही. अनेक लोक गर्दी करत आहेत. लोकांनी ऐकलं पाहिजे, लोकांच्या मनात भीती राहता कामा नये. मात्र कोव्हिड प्रोटोकॉल पाळले पाहिजेत ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे लोकांनीही तो प्रोटोकॉल पाळावा अशी अपेक्षा आम्ही करतो आहोत असंही यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in