आर्यन खान प्रकरणात साक्षीदार प्रभाकरचे समीर वानखेडेंवर आरोप, नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर साक्षीदार प्रभाकर याने गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता याच साक्षीदाराची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान एनसीबीने आमच्या साक्षीदाराने साक्ष फिरवल्याचं म्हटलं आहे. मात्र साक्षीदार प्रभाकर साईल याने आपल्याला समीर वानखेडे यांच्यापासून जिवाचा धोका असल्याची बाब मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली आहे. या सगळ्या प्रकरणी आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दोन ओळी ट्विट केल्या आहेत. सत्य ही जीतेगा, सत्यमेव जयते असं म्हणत नवाब मलिक यांनी या प्रकरणी ट्विट केलं आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रभाकरने दाखवलेला व्हीडिओ ट्विट करत या प्रकरणी आता गृहमंत्रालयाने चौकशी केली पाहिजे अशी मागणी दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तर आपच्या म्हणजेच आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनीही या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सगळ्यांना जो संशय होता ती गोष्ट खरी ठरली तर.. NCB ने खंडणी वसूल करण्यासाठी आर्यन खानला या सगळ्या प्रकरणात अडकवलं.. NCB च्या वरिष्ठांनी बॉलिवूडवर कारवाई करायला फ्री हँड दिला आहे. त्याचा एनसीबीने पूर्ण गैरफायदा घेतला. अमित शाह आणि त्यांचं गुंड हे स्वतःला संत समजत आहेत या आशयाचं ट्विट प्रीती मेनन यांनी केलं आहे. साक्षीदार प्रभाकर पुढे आल्याने आणि मीडियासमोर त्याने तोंड उघडल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे तर आर्यन प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT