देव तारी त्याला… अंगावरून एक्स्प्रेस गेली तरीही ‘ती’ वाचली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बदलापूर: देव तारी त्याला कोण मारी… अशी म्हण प्रचलित आहे. पण याच म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे (Railway) रुळाच्या मधील भागातील खडीवर एक महिला निर्धास्त पण झोपली होती. पण अचानक त्याच रेल्वे ट्रॅकवरुन उद्यान एक्स्प्रेस धावत होती.

ज्या ट्रॅकवर उद्यान एक्सप्रेस धावत होती त्याच भागात एक महिला झोपली असल्याचं लक्षात येताच एक्सप्रेस थांबविण्यात आली. ही घटना काल (17 जून) बदलापूर स्थानकादरम्यान घडली.

दरम्यान, यावेळी स्टेशन मास्तरांनी प्रसंगावधान राखून ऑनड्युटी पोलीस स्टाफला तात्काळ घटनास्थळी पाठवले. उद्यान एक्सप्रेस त्याच ट्रॅकवरुन गेलेली असताना देखील सुदैवाने ती महिला वाचली. एवढंच नव्हे तर यावेळी महिलेला छोटीशी इजा देखील झाली नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गुरुवारी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास डाऊन ट्रॅकवर ही घटना घडली. सुमारे 35 वय वर्षे असलेली ही महिला ही गाडी खाली डाऊन ट्रॅकवर सुखरूप मिळून आली. ती खडीवर झोपलेल्या अवस्थेत असल्याने जेव्हा एक्सप्रेस गेली तेव्हा तिला कोणतीही इजा झाली नाही.

यावेळी तात्काळ त्यानुसार तीला आरपीएफच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आलं आणि स्टेशन मास्तरांसमोर हजर करण्यात आलं.

ADVERTISEMENT

जेव्हा स्टेशन मास्तरांनी तिची चौकशी केली तेव्हा अशी माहिती मिळाली की, महिला घरगुती मानसिक तणावामुळे त्या ठिकाणी आली होती. संबंधित महिलेचं नाव श्रुती माळवे असं असून ती बदलापूर पूर्व भागात राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

ADVERTISEMENT

त्यानुसार पोलिसांनी या पत्यावर महिलेला नेऊन सोडलं. तसेच महिलेची आई प्रमिला शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलं. यावेळी त्यांचा रितसर जबाब घेण्यात आला आणि त्यानंतरच पोलिसांनी तिला तिच्या आईच्या ताब्यात दिलं.

दरम्यान, आपली मुलगी सुखरुप परत आल्याने तिच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. वेळीच केलेल्या कारवाईमुळे एका महिलेचा जीव वाचला. त्यामुळेच आता अनेकांनी बदलापूर पोलीस स्थानकाचे स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिसांचे कौतुक केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT