फेसबुकवरुन मैत्री.. अनैतिक संबंध; तहसलीदारानं केली महिला कॉन्स्टेबलची हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या महिला कॉन्स्टेबलचाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास केला असता मृतदेह रुची सिंह या महिला कॉन्स्टेबलचा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणात एका तहसीलदाराला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबल 13 फेब्रुवारीपासून ड्युटीवर पोहोचली नव्हती. यानंतर महिला कॉन्स्टेबलच्या इतर सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुची सिंहचा फोन सतत बंद येत होता. त्यांनी तिच्या सहकाऱ्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

दुसरीकडे काली माता परिसरातील नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक चौकशीनंतर हा मृतदेह रुची सिंह हिचाच असल्याचं समोर आलं होतं. जेव्हा पोलिसांनी या हत्येचा तपास सुरु केला तेव्हा त्यांना अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

हे संपूर्ण प्रकरण हे प्रेमप्रकरणाचं आहे. रुची सिंह हिची फेसबुकच्या माध्यमातून नायब तहसलीदाराशी ओळख झाली होती आणि इथूनच पुढे संपूर्ण कहाणीला सुरुवात झाली.

ADVERTISEMENT

रुचीच्या हत्येप्रकरणी प्रतापगडचे तहसीलदार पदमेश श्रीवास्तव, त्यांची पत्नी प्रगती श्रीवास्तव आणि जवळचा मित्र नामवर सिंग यांना अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

फेसबुकवरुन तहसीलदाराशी झालेली ओळख

तपासादरम्यान पोलिसांना सापडलेले पुरावे आणि समोर आलेली माहिती हे दर्शवत होती की, रुची ही एक केवळ पोलीस कॉन्स्टेबल असली तरी तिची स्वप्नं खूप मोठी होती. पोलिसात नोकरी लागल्यानंतर रुचीने आपल्याच एका सहकाऱ्यासोबत लग्न केलं होतं. परंतु बाराबंकी येथे पोस्टिंगवर असताना फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख तहसीलदार पद्मेश यांच्याशी झाली होती.

रुची हिच्या एका जवळच्या मित्राचं प्रतापगडमधील एका जमिनीच्या वाद सुरु होता. तोच मिटविण्यासाठी रुची ही पहिल्यांदा पद्मेश श्रीवास्तव यांना भेटली. त्यानंतर या भेटीगाठी वाढत गेल्या. पद्मेशसोबत राहता यावं यासाठी रुचीने आपल्या हवालदार पतीला देखील सोडून दिलं. तिच्या मनात एवढंच होतं की, तहसीलदारशी लग्न करुन त्याला आपला पती बनाववं. एवढंच नव्हे तर आपल्या पहिल्या पतीपासून कायमचं दूर व्हावं यासाठी तिने घटस्फोटाचा अर्जही दाखल केला होता. कोर्टात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या खटल्याचा निर्णयही याच महिन्यात येणार होता.

दुसरीकडे रुचीने विवाहित असलेल्या तहसीलदारावर लग्नासाठी दबाव टाकला. पद्मेश हा रुचीपेक्षा वयाने बराच मोठा होता. पण तरीही तो तिच्यात एवढा गुंतला होता की, आपली पत्नी प्रगती हिला अलाहाबादमध्ये सोडून तो रुचीला भेटण्यासाठी सतत लखनऊला येत होता.

रुचीची डीजीपी मुख्यालयात बदली देखील पद्मेशनेच केल्याची चर्चा आहे. कारण बाराबंकीहून प्रतापगडला भेटायला जाण्यासाठी जास्त वेळ लागायचा आणि पोलिस स्टेशनच्या ड्युटीत रजा देखील मिळत नसे. अशा स्थितीत लखनऊ येथील पोलीस मुख्यालयातील बदलीमुळे भेटणं देखील सोपं झालं. कारण इथे रुचीला शनिवार आणि रविवार सुट्टी देखील मिळत असे.

लखनऊला बदली झाल्यानंतर रुची ही सुलभ अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. हा फ्लॅट देखील तिला तहसीलदार पद्मेशनेच दिल्याचे सांगितले जात आहे. आता या अपार्टमेंटच्या खऱ्या मालकाचा शोध सुरू आहे. या हत्येत पती-पत्नीशिवाय तिसरा आरोपी नामवर सिंग हा देखील कटात सहभागी होता.

दरम्यान, रुची आणि पद्मेशच्या भेटी वाढल्यानंतर रुची वारंवार त्याला लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे या प्रकाराला पद्मेश वैतागला आणि त्याने सगळा प्रकार आपल्या पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याची पत्नी प्रगती हिने रुचीचा काटा काढण्यासाठी पद्मेशला एक प्लॅन दिला. या प्लॅनमध्ये नामवर सिंग याचा एका प्याद्यासारखा वापर करण्यात आला. प्रत्यक्षात प्लॅनिंग असे होते की, पद्मेश रुचीला भेटण्यासाठी बोलावेल. नंतर तिला बेशुद्ध करुन तिची हत्या केली जाईल आणि नंतर नामवर तिचा मृतदेह दूरवर फेकून देईल.

अशा स्थितीत खुनाच्या गुन्ह्यात नामवर हाच पकडला जाईल अशा पद्मेश आणि प्रगतीचा होरा होता. दरम्यान, 12 फेब्रुवारीला संध्याकाळी पद्मेशने रुचीला फोन करून भेटण्यासाठी पीजीआय परिसरात बोलावलं. रुची आणि पद्मेश ज्या गाडीत बसले होते ती गाडी नामवरची होती. नामवर यांनी पीजीआयमधील एका ज्यूस कॉर्नरमधून रुचीसाठी ज्यूस घेतला. यावेळी डाळिंबाच्या ज्यूसमध्ये त्याने अल्प्रेक्सच्या 10 गोळ्या मिसळून रुचीला दिल्या.

8 वर्षांपासून सुरू होते महिलेचे अनैतिक संबंध, 5 जणांना सुपारी देऊन केली पतीची हत्या

रुची बेशुद्ध पडल्यावर तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर नामवारने रुचीचा मृतदेह गाडीतून नाल्यात फेकून दिला. मात्र, नामवारच्या एक कृतीमुळे तहसीलदारची पत्नी प्रगती श्रीवास्तव हिला देखील हत्येचा आरोपी बनवले. नामवारने घटनास्थळावरून रुचीचा फोन बंद केला आणि तिथूनच त्याने पहिला फोन प्रगतीला केला आणि सांगितलं की, काम पूर्ण झालंय!

पोलिस तपासात रुचीचे तहसीलदारांशी झालेले शेवटचे बोलणे आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून तहसीलदारांच्या पत्नीच्या नंबरवर आलेला कॉल आणि रुचीचा मोबाइल बंद होण्याची वेळ या तीनही घटनांची या संपूर्ण कटाशी जोडणी झाली आणि त्यानंतरच या तीनही आरोपींना पकडण्यात आलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT