Covid 19: कोरोनाचा युरोपमध्ये कहर, 7 लाख मृत्यू होतील अशी WHO ने व्यक्त केली भीती

जाणून घ्या आणखी काय म्हटलं आहे WHO ने
Covid 19: कोरोनाचा युरोपमध्ये कहर, 7 लाख मृत्यू होतील अशी WHO ने व्यक्त केली भीती

युरोपमध्ये कोरोनाचा कहर माजला आहे, कारण या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. युरोपात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे हा व्हायरस वेगाने पसरला आहे. मास्क न लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणं या गोष्टी घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी कोरोना वाढला आहे. यानंतर WHO ने कोरोना व्हायरसचे वाढते रूग्ण पाहून युरोपमध्ये 7 लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा देत भीती व्यक्त केली आहे. युरोपातल्या 53 देशांमध्ये सात लाख मृत्यू होऊ शकतात असं WHO ने म्हटलं आहे.

कोरोना मृत्यू
कोरोना मृत्यू (फाइल फोटो)

WHO युरोपने हेदेखील म्हटलं आहे की लोक कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जी काळजी घ्यायला हवी ते घेत नाहीत. जे अतिसंवेदनशील आहेत त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देणं आवश्यक आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे त्यांना बुस्टर डोस देण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तसंच ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांनाही बुस्टर डोस दिला गेला पाहिजे.

युरोपमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्ग वाढतो आहे. तसंच मास्क न घालणं आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणं या लोकांनी केलेल्या दुर्लक्षांमुळेही संसर्ग वाढतो आहे. तसंच युरोप मध्ये अनेक जणांनी अद्याप लसीकरण केलेलं नाही. युरोपमधल्या 53 पैकी 25 देशांमध्ये 1 मार्च 2022 पर्यंत बेडची कमतरता भासू शकते. 1 मार्च 2022 पर्यंत युरोपमध्ये झालेल्या मृत्यूंची संख्या ही 20 लाखांच्या घरात असू शकते असंही WHO ने म्हटलं आहे.

Covid 19: कोरोनाचा युरोपमध्ये कहर, 7 लाख मृत्यू होतील अशी WHO ने व्यक्त केली भीती
समजून घ्या : Delta+ Variant नेमका आहे तरी काय? महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?

डेल्टा व्हेरिएंट काय आहे?

डेल्टा या व्हेरिएंटला B.1.617. असं आधी म्हणत होते, तो सगळ्यात आधी भारतातच आढळून आला. त्यामुळे त्याला इंडियन व्हेरिएंट असंही म्हणत. पण कोणत्याही एका व्हेरिएंटला त्या देशाच्या नावाने ओळखलं जाऊ नये, असं म्हणत WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं व्हेरिएंटला वेगळी नावं ठेवली. त्यामुळे या व्हेरिएंटला डेल्टा व्हेरिएंट असं म्हणतात. या व्हेरिएंटला WHO ने Variant of concerns म्हणजेच चिंताजनक प्रकारात मोडणारा व्हेरिएंट असंही वर्गीकृत केलंय.

हा व्हायरस आला कुठून तर...दोन व्हेरिएंटमधून E484Q आणि L452R असे म्युटेशन झाले, आणि त्यातून नवा व्हेरिएंट तयार झाला, ज्याला आपण B.1.617 म्हणजेच डेल्टा व्हेरिएंट म्हणतो. याचेच महाराष्ट्रात सँम्पल्सही मिळालेले. ऑक्टोबर 2020 मध्येच हा व्हेरिएंट सर्वप्रथम सापडला होता.

या व्हेरिएंटचे पुढे उपप्रकारही आले...भारतात कोरोनाची दुसरी लाट या डेल्टा व्हेरिएंटमुळेच आली, असंही मानलं जातं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे 1 लाख 80 हजार मृत्यू झाले आहेत. इतकंच नाही तर या व्हेरिएंटमुळेच कुटुंबच्या कुटुंब कोरोनामुळे संक्रमित होत असल्याचंही म्हटलं जातं, जे की कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in