Covid 19: महाराष्ट्रात पुन्हा मंदिरं होऊ लागली बंद, मांढरदेवीच्या काळूबाईची यात्राही रद्द

Yatra of Mandhardevi Kalubai in Satara cancelled: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
Covid 19: महाराष्ट्रात पुन्हा मंदिरं होऊ लागली बंद, मांढरदेवीच्या काळूबाईची यात्राही रद्द
yatra of mandhardevi kalubai in satara cancelled due to increasing corona infection covid 19

सातारा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची यात्रा रद्द झाल्याने भाविकांमध्ये मात्र नाराजी पाहायला मिळत आहे.

10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत भाविकांना गडावर येण्यास बंदी करण्यात आल्याचं समजतं आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं आहे.

नेमका निर्णय काय?

ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदाची यात्रा 16, 17 आणि 18 जानेवारी नियोजित आहे. यंदाच्या यात्रेचा मुख्य दिवस 17 जानेवारी आहे. मात्र देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक यात्रेअगोदर 15 दिवस आणि यात्रेनंतर 15 दिवस सतत गडावर येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या सर्व बाबी लक्षात घेऊनच 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान मांढरदेवी परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

याशिवाय वाई तालुक्यातील सुरुर येथील धावजी बुवा यात्रा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रचलित असलेल्या मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.

तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा होणार

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. 11 जानेवारी ते 18 जानेवारी या काळात विविध धार्मिक कार्यक्रम , विधी व कुलाचार संपन्न होणार आहेत. कोरोना व ओमीक्रोनच्या पार्शवभूमीवर शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

मंदिर संस्थान तुळजापूर यांच्यावतीने सर्व पुजारी, महंत, सेवेकरी व भाविक ,भक्तांना आवाहन करण्यात आले आहे की दिनांक 11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत शाकंभरी नवरात्र महोत्सव कोरोना व ओमिक्रोन विषाणूच्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने संपन्न होणार आहे.

yatra of mandhardevi kalubai in satara cancelled due to increasing corona infection covid 19
वाढत्या रूग्णसंख्येबाबत आणि निर्बंधांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन, म्हणाले....

महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन, पाहा काय आहेत नवे नियम

 • पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही

 • रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही

 • लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थिती

 • अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार

 • शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

 • थिएटर्स, नाट्यगृहं 50 टक्के उपस्थितीची मुभा

 • सलून आणि खासगी कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा

 • खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात यावं

 • पूर्ण लसीकरण झालेल्या सार्वजिनक बसने वाहतूक करण्यास मुभा

 • हॉटेल, रेस्तराँ रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

 • स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळ पूर्णतः बंद

 • महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

 • हॉटेल्स रेस्तराँमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलिव्हरी सेवा पूर्णवेळ सुरू राहणार

 • 24 तास सुरू राहणारे कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार

 • दुकानं, हॉटेल्स रेस्तराँमध्ये काम करणाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतलेल्या असणं बंधनकारक

 • लसीचे दोन डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्तराँवर कारवाई केली जाणार

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in