Crime: अवघ्या 3 वर्षाच्या पुतणीची काकूने केली हत्या, 5 दिवस मृतदेह ठेवलेला गव्हाच्या कोठीत
yavatmal crime 3 year old nephew killed by aunt deadbody was kept in the house for 5 days(प्रातिनिधिक फोटो)

Crime: अवघ्या 3 वर्षाच्या पुतणीची काकूने केली हत्या, 5 दिवस मृतदेह ठेवलेला गव्हाच्या कोठीत

Yavatmal 3 year old girl Murder Case: यवतमाळमध्ये तीन वर्षीय मुलीची हत्या तिच्या काकूनेच केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

यवतमाळ: आपल्याच तीन वर्षाच्या चिमुकली पुतणीची हत्या करुन तिला गव्हाच्या कोठीत पुरतल्याची अत्यंत धक्कादायक घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. अंगणात खेळणाऱ्या, बागडणाऱ्या चिमुकली मानवी हिची हत्या तिची काकूच करेल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, मानवी हिची तिच्या चुलत काकूनेच हत्या करुन तिचा मृतदेह गव्हाच्या कोठीमध्ये तब्बल पाच दिवस ठेवला होता. पण पाच दिवसानंतर मृतदेहाला दुर्गंधी येत असल्याने तिने मानवीचा मृतदेह काढून त्यांच्या घरामागील पाण्याच्या टाकीजवळ ठेवला.

गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या मानवीचा थेट मृतदेह सापडल्याने तिच्या कुटुंबीयांना खूपच धक्का बसला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीलाच मानवीची चुलत काकू दिपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हिची चौकशी केली.

सुरुवातीला दिपाली हिने फारच उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दिपालीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे मानवी चोलेच्या हत्येच्या प्रकरणाचा छडाही लागला. 

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील तीन वर्षीय मानवी ही 20 डिसेंबर पासून बेपत्ता झाली होती. अशी तक्रार मृत मानवीचे वडील अविनाश चोले यांनी आर्णी पोलीस ठाण्यात दिली होती.

तिला शोधण्यासाठी कुऱ्हा या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तर विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथक व सायबर सेल येथील एक असे चार पथक गठित करून गावशेजारील जंगल परिसरात व इतर ठिकाणी तिचा शोध घेणे सुरू होते.

ज्या दिवशी मानवी बेपत्ता झाली त्याचदिवशी तिला ठार करुन काकू दिपालीने तिचा मृतदेह स्वयंपाक घरातील गव्हाच्या छोट्या कोटीमध्ये लपवून ठेवला होता. गावामध्ये सतत पोलिसांचा वावर असल्याने आरोपी म्हणजेच चुलत काकू दिपाली उर्फ पुष्पा गोपाळ चोले मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात संधी मिळाली नाही.

ज्या दिवशी मानवीच्या मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला तसं तिने मानवीचा मृतदेह हा स्वतःच्या बचावासाठी गावातीलच एका घराच्या मागील बाजूस टाकून दिला. मानवीचे मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच त्वरित श्वानपथक बोलावून तपास सुरू करण्यात आला.

yavatmal crime 3 year old nephew killed by aunt deadbody was kept in the house for 5 days
भुसावळ: 46 वर्षीय पत्नीने 50 वर्षीय पतीचा गळा आवळून केली हत्या, नेमकं काय घडलं?

श्वानपथकाने मानवीच्या शरीराभोवती पडलेल्या गव्हाच्या दाण्यावरुन आरोपीच्या घरातील स्वयंपाक घरापर्यंत धाव घेतील. त्यानंतर पोलिसांनी पुष्पा चोले हिला ताब्यात घेऊन तिची केली असता तिने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यात आर्णी पोलीस ठाणे यांच्याकडून या प्रकरणात अजून कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का? याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, तीन वर्षाच्या मुलीच्या हत्या गुप्तधन, आपआपसातील वाद या हेतूने केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, ही हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली याबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in