चहामधून दिलं गुंगीचं औषध अन् काढले अश्लील फोटो; ब्लॅकमेल करत महिलेवर बलात्कार

यवतमाळमधली धक्कादायक घटना, आरोपीचा शोध सुरु
चहामधून दिलं गुंगीचं औषध अन् काढले अश्लील फोटो; ब्लॅकमेल करत महिलेवर बलात्कार

यवतमाळमध्ये एका महिलेला चहातून गुंगीचं औषध देऊन नंतर तिचे अश्लिल फोटो काढून बदनामी करायची धमकी देत शाररिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल सात वर्ष आरोपी करत असलेला छळ सहन केल्यानंतर महिलेने आज याविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

यवतमाळमधील अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विशाल झेंडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे.

आरोपी विशाल हा पीडित महिलेच्या बाजूलाच राहत असून त्याने काही वर्षांपूर्वी या महिलेला आई बोलावते आहे असं सांगून घरी बोलावलं. ही महिला घरी आल्यानंतर त्याने चहा तयार करुन त्याच गुंगीचं औषध घातलं. चहा प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो काढत ते सर्व ठिकाणी व्हायरल करण्याची धकमी दिली.

आरोपी विशालने या महिलेकडे शरिरसुखाची मागणी केली. बदनामीच्या भीतीने सदर महिला आरोपीच्या दबावाला बळी पडली. यानंतर तब्बल ७ वर्ष हा प्रकार सुरु होता. अखेरीस आरोपीचा छळ सहन न झाल्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या आरोपीचा शोध घेत आहेत.

चहामधून दिलं गुंगीचं औषध अन् काढले अश्लील फोटो; ब्लॅकमेल करत महिलेवर बलात्कार
ऐकावं ते नवलच ! वाळत घातलेल्या अंडरवेअरवरुन पोलिसांनी लावला आरोपीचा छडा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in