
मुंबई: Instagram Reels हे खूप लोकप्रिय फीचर आहे. याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी Meta ने फेसबुकवर देखील शॉर्ट-व्हिडिओ फीचर आणलं आहे. आता फेसबुक यूजर्संना तब्बल 3 लाख रुपये कमावण्याची संधी देत आहे.
यासाठी यूजर्संना ओरिजिनल कंटेंट तयार करावा लागणार आहे. कंपनीने फेसबुकवर Challenges सादर केले आहेत. यामुळे क्रिएटर्संना Reels Play बोनस कार्यक्रमात सहभागी होता येईल. मेटा ने म्हटले आहे की, ते पेआउट कसे कॅलक्युलेट केले जावे याबाबत काम सुरु आहे.
हे त्या क्रिएटर्सला रिवॉर्ड मिळणार आहे जे हाय-क्वॉलिटी ओरिजिनल कंटेट तयार करतील. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, एका महिन्यात क्रिएटर्सला $ 4000 (सुमारे 3 लाख रुपये) पर्यंतचे बक्षीस दिले जाईल. कार्यक्रमाचे सर्व क्रिएटर्स दर महिन्याला चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकतात.
पहिले चॅलेंज पूर्ण केल्यावर, दुसरे चॅलेंज अनलॉक होईल!
उदाहरणार्थ, जेव्हा तुमचे 5 रील 100-100 वेळा प्ले केले जातील तेव्हा कंपनी $20 चे बक्षीस देईल. हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर क्रिएटरसाठी आणखी एक चॅलेंज अनलॉक होईल. म्हणजेच, 5 रील्स चॅलेंज पूर्ण केल्यानंतर, क्रिएटरला एक नवीन चॅलेंज मिळेल, ज्यामध्ये त्यांचे 20 रील्स हे 500-500 वेळा प्ले झाले तर कंपनी त्यांना 100 डॉलर्सचे बक्षीस देईल.
Challenges वर क्रिएटर्सचं प्रोगेस दर 30 दिवसांच्या बोनस पीरियडनंतर पुन्हा रँक केली जाईल. यामध्ये यूजर्सना इतरांच्या कंटेंटची कॉपी केल्याबद्दल कोणतेही रिवॉर्ड दिले जाणार नाही. यावर, यूजर्संना केवळ ओरिजिनल कंटेंटसाठी पैसे दिले जातील.
फेसबुकने गेल्या वर्षी 150 हून अधिक देशांमध्ये शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग फीचर Reels लाँच केले आहे. यामध्ये रील यूजर्संसाठी नवीन एडिटिंग टूल्स देखील जोडण्यात आले आहेत. यामध्ये व्हिडिओ क्लिपिंग आणि इतर टूल्सचा देखील समावेश आहे.
फेसबुक आपल्या बिझनेसच्या दृष्टीने सातत्याने नवनवे प्रयोग करत असतं. तसंच आपल्या यूजर्संना देखील यातून फायदा होईल. ही व्यावसायिक बाब लक्षात ठेऊन फेसबुक आता रिल्सचं फीचर घेऊन आलं आहे. त्यामुळे इंस्टाग्राम रिल्सनंतर फेसबुक रिल्सला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.