
कुँवरचंद मंडले, नांदेड: नांदेडमधील मुखेड तालुक्यातील हिब्बट येथे एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने भाऊ आणि वहिनी संपत्तीत हिस्सा देत नसल्यानेथ थेट सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रमाकांत हणमंत कागणे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. कागणे यांची नांदेड, देगलूर, मुखेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रापर्टी आहे. या दोन भावात प्रापर्टी वरुन बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. भाऊ गोविंद कागणे प्रापर्टीत हिस्सा देत नसल्याच्या तणावातून रमाकांत याने आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे.
आत्महत्येपूर्वी रमाकांत याने दोन मिनिटांचा व्हिडीओ तयार केला या व्हिडीओत आपल्या पश्चात माझ्या वाट्याची संपत्ती पत्नीला द्यावी असं त्याने यावेळी म्हटलं आहे.
'त्या' व्हिडिओमध्ये नेमकं काय?
'माझ्या पश्चात माझ्या वाट्याची संपत्ती पत्नीला द्यावी. माझा मोठा भाऊ गोविंद उद्या सांगेल की रमाकांत याने व्यसनाच्या आहारी आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केली. पण मी ही आत्महत्या प्रापर्टीत हिस्सा मिळत नसल्याने करत आहे.' असा व्हीडिओ रमाकांत याने शेअर केला होता.
दरम्यान, आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा देखील केला. तसचे रमाकांत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आता या प्रकरणी रमाकांत याने आरोप केलेल्या गोविंद कागणेविरोधात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
निवडणुकीत पत्नीचा पराभव, पतीने केली आत्महत्या
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ओडिशात (odisha) पंचायत निवडणुकीत (election) पराभव झाल्यानंतर लोकांच्या टोमण्यांना कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचवेळी त्यांच्या पत्नीनेही (Wife) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे तिचा जीव बचावला.
वास्तविक, पंचायत निवडणुकीत या महिलेचा पराभव झाला होता. त्यानंतर विजयी पक्षाच्या लोकांनी महिलेच्या पतीला सातत्याने टोमणे मारण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांनी याबाबत अशी माहिती दिली होती की, 'विजयी उमेदवाराचे समर्थक रविवारी संध्याकाळी विजयी रॅली काढत होते. त्यांनी रमाकांतला तिथे पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नीच्या पराभवावरुन त्याला टोमणे मारण्यास सुरुवात केली. यानंतर रमाकांत निराश होऊन घरी गेला आणि त्याने पत्नीशी देखील भांडण केलं. याच भांडणानंतर पत्नीने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.'