9 बायकांसोबत राहतो हा तरुण, 'या' कारणासाठी सोशल मीडियावर आहे चर्चेत

एक तरुण 1 नव्हे तर तब्बल 9 बायकांसोबत राहतो एवढंच नव्हे तर या नऊही बायकांकडून त्यांना मुलं हवी आहेत. त्यामुळे या तरुणाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
9 बायकांसोबत राहतो हा तरुण, 'या' कारणासाठी सोशल मीडियावर आहे चर्चेत
young man who lives with 9 wives wants children from every wife(फोटौ सौजन्य: Arthur O Urso)

एक तरुण 1 नव्हे तर तब्बल 9 बायकांसोबत राहतो. एवढंच नव्हे या तरुणाचं असंही म्हणणं आहे की, त्याला त्याच्या सगळ्या बायकांकडून मुलं हवी आहेत. त्याचं म्हणणं आहे जर त्याच्या फक्त एक किंवा दोन बायकांनाच मुले झाली तर बाकीच्या बायकांसाठी ते योग्य ठरणार नाही. म्हणूनच त्याने ठरवले आहे की, त्याच्या सर्व बायकांना मुले होतील.

आर्थर ओ उरसो असे या व्यक्तीचे नाव आहे. आर्थर हा एक मॉडेल असून तो मुळचा ब्राझीलचा आहे. त्याने गेल्या वर्षी नऊ महिलांशी लग्न केल्यावर तो चर्चेत आला होता. त्याला त्यांनी 'फ्री लव्ह सेलिब्रेशन' असे नाव दिले होते.

आर्थरचे आता असे म्हणणे आहे की, त्याच्या एका पत्नीला त्याला घटस्फोट द्यायचा आहे.

आर्थरची पहिल्या पत्नीचं नाव लुआना काझाकी आहे. आर्थरने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चर्चमध्ये लग्न केले होते. त्याने कॅथोलिक रितीरिवाजांनुसार 9 स्त्रियांशी लग्न केले. त्याचा एकपत्नीत्वाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

(फोटौ सौजन्य: Arthur O Urso)

एक बायको देणार घटस्फोट

आर्थरच्या एका पत्नीने घटस्फोट देणार असल्याचे सांगितले आहे. आर्थरची पत्नी अगाथा म्हणाली की तिचा आता बहुपत्नीत्वावर विश्वास नाही. याबद्दल आर्थरने सांगितले की, तिची (अगाथा) नेहमी इच्छा होती की मी तिच्यासोबत असावे, पण तसे होऊ शकत नाही.

(फोटौ सौजन्य: Arthur O Urso)

पण या सगळ्या प्रकारामुळे आर्थर हा सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चेत आहे.

एक-दोन नव्हे तर तब्बल 8 बायकांसोबत राहतो तरुण, प्रत्येकी सोबत रोमान्स करण्यासाठी वेळही ठरलेली!

एकाच घरात 8 बायकांसह राहणाऱ्या पुरुषाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ओंग डॅम सोरोट (Ong Dam Sorot)असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा थायलंडचा (Thailand) आहे. सोरोट हा प्रत्येक पत्नीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता.

Tattoo आर्टिस्ट असणाऱ्या सोरोट याला तब्बल 1-2 नव्हे तर 8 बायका (Artist Eight Wives) आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्या सर्व बायका एकाच घरात ते देखील अगदी गुण्यागोविंदानं एकत्र राहतात. त्या सगळ्याच जणी या ओंग डॅम सोरोटवर खूप प्रेम करतात आणि त्याला जगातील सर्वात सभ्य माणूस मानतात.

सोरोट याने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'त्याच्या बायका चार स्वतंत्र बेडरूममध्ये झोपतात आणि त्यामुळे प्रत्येक पत्नी आपली वेळ कधी येईल याची आतुरतेने वाट पाहते.'

Oddity Central च्या मते, टॅटू आर्टिस्ट सोरोट एका टीव्ही शोमध्ये दिसल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. टीव्ही शोवरील मुलाखती दरम्यान, त्याने सांगितले होते की त्याच्या आठही बायका या एकमेकींशी खूप चांगल्या पद्धतीने वागतात आणि त्या सर्व सुसंवादी असून कौटुंबिक संबंध जपणाऱ्या आहेत.' सोरोटच्या या एका इंटरव्ह्यूला फक्त यूट्यूबवर 30 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

Related Stories

No stories found.