जिगलो म्हणून नोकरी लावतो असं सांगत तरूणाची 1 लाख 53 हजारांना फसवणूक

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई पोलिसांनी दिल्लीतून एका तीस वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. एका तरूणाला जिगलो (male escort) म्हणून नोकरी लावतो असं आमीष दाखवून त्याची 1 लाख 53 हजारांना फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस आता एका महिलेचाही शोध घेतल आहेत. या प्रकरणात तक्रारदाराने (नाव उघड केलेले नाही) एका वेबसाईटवर कॉल बॉय हवा आहे अशी नोकरीची जाहिरात एका वेबसाईटवर पाहिली. त्या जाहिरातीत एक नंबरही देण्यात आला होता. त्या नंबरवर त्याने संपर्क साधला.

त्यावेळी त्या मुलाला हे सांगण्यात आलं की तुला आम्ही जिगलो म्हणून काम देऊ. कंपनी सांगेल तेव्हा तुला कंपनीच्या ग्राहकांचं मनोरंजन करावं लागेल. तसंच प्रत्येक असाईनमेंटसाठी पैसे दिले जातील. जे पैसे संबंधित महिला ग्राहक देईल त्यातले 20 टक्के कंपनी ठेवेल आणि 80 टक्के पैसे दिले जातील. हे बोलणं झाल्यानंतर या तक्रारदाराला व्हॉट्स अॅपवर ओळखपत्र आणि महिला ग्राहकाचा नंबर देण्यात आला.

त्यानंतर या मुलाने त्या महिला ग्राहकाच्या क्रमांकावर फोन केला. ज्यामध्ये तिने सांगितले की ती ज्या हॉटेलमध्ये भेटायचं आहे तिथे टॅक्सीने येण्याची व्यवस्था हे सगळं सांगेल. त्यानंतर तिने त्याला 32 हजार रूपये जमा करण्यास सांगण्यात आलं. भेटल्यानंतर पैसे परत मिळतील असंही आश्वासन दिलं गेलं अशी माहिती मुंबईतल्या माटुंगा पोलिसांनी दिली. हे सांगितल्यानंतर तक्रारदाराने पैसे जमा केले. यानंतर महिलेने फोन उचलणं बंद केलं. त्यानंतर या तक्रारदाराने पुन्हा कंपनीच्या नंबरवर फोन केला. त्यावेळी त्याला हे सांगण्यात आलं की जी मिटिंग ठरली होती ती रद्द झाली आहे. आम्ही तुला दुसऱ्या महिला ग्राहकाचा क्रमांक पाठवतो. त्याने आपण 32 हजार रूपये त्या महिलेला दिल्याचंही सांगितलं. ज्यानंतर मिटिंगच्या दरम्यान हे पैसे परत केले जातील असं आश्वासन त्याला देण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तक्रारदाराने दुसऱ्या क्लाएंटशी संपर्क साधल्यावर तिने त्याला 1.21 लाख रुपये एका खात्यात जमा करण्यास सांगितले आणि भेटीदरम्यान मिळणार्‍या शुल्कासह ती रक्कम परत करेल असे आश्वासनही दिले. त्यानंतर तक्रारदाराने आपल्या वडिलांकडून ही रक्कम उधार घेतली आणि पैसे जमा केले परंतु तेव्हापासून महिला आणि पुरुषाने त्यांचे फोन घेणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने 22 डिसेंबर रोजी माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

माटुंगा पोलिसांनी बँक खात्याच्या नोंदी आणि सिमकार्डचा तपशील तपासला आणि नुकतीच नवी दिल्लीतून रोहितकुमार गोवर्धन याला अटक केली. गोवर्धनला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदाराशी बोलणारी महिला ही विवाहित असून ती गोवर्धन यांची माजी सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे आणि कथितरित्या हा फोन आला आणि त्याने त्याच्याशी किरकोळ कारणासाठी बोलले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT