बुलढाणा : मोटारसायकल अपघाताचं निमीत्त, युवकाचं अपहरण करुन मारहाण

डोळ्यावर पट्टी बांधून अज्ञात स्थळी नेऊन केली मारहाण, शेगाव परिसरात तणाव
बुलढाणा : मोटारसायकल अपघाताचं निमीत्त, युवकाचं अपहरण करुन मारहाण

- ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये एक विचीत्र घटना घडली आहे. मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या भावाला मदत करण्यासाठी आलेल्या भावाचं अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवरुन शेगावात शनिवारी दिवसभर तणावाचं वातावरण होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विना नंबरची पल्सर गाडीने शहरातून मिल्लत नगरकडे येणाऱ्या आबीद शहा इस्माईल या युवकाच्या गाडीला धडक दिली. या अपघातात आबीद शहा रस्त्यावर पडून जखमी झाला. दुसऱ्या बाजूला पल्सर गाडीवरील दोन युवकही समोर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन आदळले. यादरम्यान दोन्ही युवकांनी आपल्या नातेवाईकांना या अपघाताची माहिती दिली. आबीद शहानेही फोन करुन आपला लहान भाऊ रिजवानला मदतीसाठी बोलावलं.

बुलढाणा : मोटारसायकल अपघाताचं निमीत्त, युवकाचं अपहरण करुन मारहाण
बॉईल अंड्याचे पैसे देण्यावरुन वाद, दोघांच्या भांडणात समजवायला गेलेल्या तिसऱ्याची हत्या

यावेळी रस्त्यावर पडलेल्या नागरिकांनी अपघातात जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात हलवलं. यावेळी आबीदचा भाऊ रिजवान घटनास्थळी दाखल होऊन बाईक उचलत असताना काही अज्ञात तरुणांनी मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर हे युवक रिजवानला एका अज्ञात स्थळी घेऊन गेले तिकडेही त्याला बेदम मारहाण झाल्याचं कळतंय.

या घटनेची माहिती मिळताच अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांनी शेगाव पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. ज्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवला गेला. याचदरम्यान एकीकडे रिजवानचा शोध सुरु होता. १ जानेवारीला दुपारी अचानकपणे रिजवान आझाद नगर परिसरात सापडला. रिजवानने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला अज्ञात स्थळी मारहाण करण्यात आली. यानंतर त्याचे हात बांधून सोडून देण्यात आलं. पोलीस आता रिजवानने दिलेल्या माहितीवरुन पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in