कतरिना कैफ-विकी कौशल 'या' हॉटेलमध्ये करणार लग्न; तुम्ही फोटो बघितलेत का?

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: राजस्थानमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये होणार विवाहसोहळा : एका रात्रीचा खर्च आहे 1 लाख 90 हजार
कतरिना कैफ-विकी कौशल 'या' हॉटेलमध्ये करणार लग्न; तुम्ही फोटो बघितलेत का?
कतरिना कैफ-विकी कौशल डिसेंबर करणार लग्न...AajTak
Published on

मागील काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील आणखी एक जोडप बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढणार असल्याचं वृत्त असून, डिसेंबरमध्ये दोघं राजस्थानातील एका हॉटेलमध्ये विवाह करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (bollywood news katrina kaif vicky kaushal wedding place)

विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघे राजस्थानमध्ये विवाह करणार आहेत. सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेल्या एका अलिशान हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे.

सिक्स सेंसेज फॉर्ट हॉटेल, असं या हॉटेलचं नाव असून, आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार 7 ते 12 डिसेंबरपर्यंत या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलेलं आहे.

डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर आलेली असली, तरी अभिनेता विकी कौशल वा कतरिना कैफ यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सिक्स सेंसेज फॉर्ट एक अलिशान हॉटेल म्हणून प्रसिद्ध असून, हॉटेलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार राजा मान सिंह सूट सर्वात महागडा आहे. या सूटचं एका रात्रीचं भाडं 64,000 ते 90,000 इतकं आहे.

या सूटमध्ये स्वतंत्र बेडरूम, खाजगी स्नानगृह, पूल, टेरेस, आऊटडोअर शॉवर यासह विविध सुविधा आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या विवाह सोहळ्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून, त्यासाठी कंपन्यांना काम देण्यात आलेलं आहे.

ज्या कंपन्यांना लग्नातील विविध कार्यक्रमाचं काम मिळालेलं आहे. त्यांचे प्रतिनिधी सवाई माधोपूरमधील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जागा शोधत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे विकी-कतरिनाच्या टीमनेही लग्नाची तयारी सुरू केली आहे.

माहितीप्रमाणे 10 लोकांचा समावेश असलेली एक टीम सिक्स सेंसेज फॉर्ट हॉटेलमध्ये मंगळवारी दाखल झाली. हॉटेल व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे ही टीम लग्नाच्या तयारीची देखरेख करणार आहे.

नवरदेवाची एंन्ट्री आणि मेहंदीचा कार्यक्रमच्या ठिकाणाची टीमकडून पाहणी करण्यात आली आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी अद्याप लग्नाबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चाही दररोज होताना दिसत आहे. काही दिवसापूर्वीच विकी कौशलने लग्नानंतर राहण्यासाठी विराट कोहलीच्या इमारतीत आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली होती.

लग्नाच्या तयारी बरोबरच आता कतरिना कैफने डान्सची तयारी सुरू केली असल्याची वृत्त आहे. गुरुवारी विकी कौशलला याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला होता. मात्र, विकी कौशलने कोणतंही उत्तर दिलं नाही. तर हा प्रश्न ऐकून सोबत असलेल्या सारा अली खानला हसू अनावर झालं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in