मोठी दुर्घटना टळली! महामार्गावर बसने घेतला पेट; तीन जणांची प्रकृती गंभीर
अपघातानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली बस.

मोठी दुर्घटना टळली! महामार्गावर बसने घेतला पेट; तीन जणांची प्रकृती गंभीर

20 ते 22 प्रवासी जखमी : अकोला नॅशनल हायवे 6 वर बस आणि ट्रकचा समोरासमोर अपघात
Published on

ट्रक आणि बस समोरासमोर आल्यानंतर दोन्ही वाहनांवरील चालकांचं नियंत्रण सुटल्यानं अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अघतात झाला. या अपघातानंतर आगीने बसचा ताबा घेतला.

या घटनेत 20 ते 22 प्रवासी जखमी झाले असून, तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेळीच प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यानं मोठी जीवितहानी टळली.

अकोला नॅशनल हायवे 6 वर बुधवारी दुपारी भयंकर दुर्घटना घडली. बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 20 ते 22 प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींपैकी तीन ते चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अकोल्याहून मुंबईकडे माल घेऊन जाणार ट्रक आणि बाळापूरवरून अकोल्याला येणारी बस अचानक समोरासमोर आली. ट्रकचालक आणि बसचालक दोघांचंही वाहनांवरील नियंत्रण सुटलं आणि दोन्ही वाहने एकमेकांवर धडकली. या भयंकर अपघातानंतर बस आणि ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगी भडकली.

अचानक ट्रक आणि बसने पेट घेतल्यानंतर बसमधील प्रवाशांची तारांबळ उडाली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि बाळापूर हायवे पोलीस आणि बाळापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

अधिकारी कर्मचाऱ्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढलं.

त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून सर्वांना बाळापूर व अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सुदैवाने वेळीच मदत पोहोचल्यानं मोठी जीवितहानी टळली. मात्र, जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती बाळापूरचे एपीआय विनोद घुइकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.