टोक्यो ते नारा : शिंजो आबे यांचा असा होता राजकीय प्रवास

Former Japanese PM Shinzo Abe dies after being shot : शिंजो आबे यांची राजकीय कारकीर्द
Former Japanese Prime Minister Shinzo Abe dies after being shot
Former Japanese Prime Minister Shinzo Abe dies after being shotPhoto/Reuters
Published on
Photos/Reuters

सर्वाधिक काळ जपानचे पंतप्रधान राहिलेल्या शिंजो आबे यांचं शुक्रवारी (८ जुलै) दुर्दैवी निधन झालं. शिंजो आबे निवडणुकीच्या प्रचाराचं भाषण करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

शिंजो आबे हे नारा शहरात भाषण करत असतानाच आरोपीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. लागोपाठ दोन गोळ्या लागल्यानंतर शिंजो आबे जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गोळ्या लागल्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव झालेल्या शिंजो आबे यांना ह्रदविकाराचा झटकाही आला होता. त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांकडून झाले, मात्र छातीच्या जवळ आणि मानेवर गोळी लागलेल्या शिंजो आबे यांनी उपचारादरम्यान प्राण सोडला.

शिंजो आबे यांचा राजकीय प्रवास लक्षवेधी राहिला. २१ सप्टेंबर १९५४ रोजी जपानमधील टोक्यो शहरात शिंजो आबे यांचा जन्म झाला.

१९९३ मध्ये ते पहिल्यांदा जिंकले. यामागुची मतदारसंघातून त्यांनी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती.

२००६ मध्ये शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.

२०१२ मध्ये शिंजो आबे दुसऱ्यांदा जपानचे पंतप्रधान झाले.

२०१४ मध्ये पुन्हा शिंजो आबे यांची पंतप्रधानपदी निवड झाली.

२०१७ मध्ये शिंजो आबे यांनी संविधान सुधारणा वर्ष म्हणून २०२० पर्यंतचं लक्ष्य ठेवलं.

२०२० मध्ये शिंजो आबे जपानचं पंतप्रधानपद सर्वाधिक काळ भूषवणारे नेते ठरले. २ हजार ८०० दिवस ते जपानचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते.

२०२० मध्ये आरोग्याच्या कारणामुळे शिंजो आबे यांनी पंतप्रधानावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि पदाचा राजीनामा दिला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in