काळ दबा धरून बसला होता, पण...; मुरुडच्या समुद्रात तटरक्षक दलाचं साहसी 'रेस्क्यू ऑपरेशन'

Coast Guard Rescues Crew Of Sinking boat In Raigad : समुद्रात भरकटलेल्या गुजरातच्या मच्छिमारांची सुखरुप सुटका
Raigad : Indian Coast Guard rescued 10 fishermen

Published on
तुफानी पाऊस आणि उफाणलेल्या समुद्राच्या तडक्यात सापडलेल्या दहा मच्छिमारांना तटरक्षक दलाने मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं.

महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असतानाच तटरक्षक दलाने हे साहसी रेस्क्यू ऑपरेशन केलं.

गेल्या काही दिवसांपासून कोकणत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे समु्द्र खवळलेला आहे. अशा स्थितीत मुरुडजवळील समुद्रात गुजरातमधील मच्छिमारांची बोट दिसली.

गुजरातमधील हे मच्छिमारांची बोट सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसात भरकटली. ही बोट तशीच भरकट पोहोचली ती, कोकण किनारपट्टीवर.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील पद्मदूर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस 9 ऑगस्ट रोजी रात्रीपासून समुद्रात गुजरातचे ही बोट अडकून पडली होती.

हे जहाज आज सकाळी मोरे गावाच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे एक  किलोमीटरच्या अंतरावर आले.

त्यातील कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसहित मुरूड प्रशासनातील अधिकाऱ्यांना बचाव मोहीम हाती घेतली.

भारतीय तटरक्षक दल आणि स्थानिक प्रशासनाने बोटीतील मच्छिमारांना बोटीतून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

पावसाचा जोर जास्त असल्यानं रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान अडथळे निर्माण होत होते. अडथळ्यांवर मात करत तटरक्षक दलाने सर्व मच्छिमारांना सुखरुप बाहेर काढले.

मुरुड मधील समुद्रात अडकलेल्या गुजरातच्या मासेमारी बोटीतील सर्व मच्छिमाऱ्यांना तटरक्षक दलाने सुरक्षित किनाऱ्यावर आणले. याबद्दलची माहिती मुरूड तहसिलदार रोहन शिंदे यांनी दिली.

या मासेमारी बोटीमध्ये 10 मच्छिमार होते. तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

मच्छिमारांच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे हे मुरूड तहसिलदारांच्या संपर्कात होते.

हवामान खराब झालेलं असतानाच बोटीचं इंजिन बंद पडलं आणि बोट भरकटली, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली.

Mumbai Tak
www.mumbaitak.in