काय ती थंडी... काय ते हिमकण; हे शिमला नव्हे तर आपलं...

Mahabaleshwar Snow: गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून वेण्णालेक लिंगमळा परिसरामध्ये अक्षरश: बर्फाची चादर पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.
हिवाळ्यातील मनमोहक महाबळेश्वर, पाहा खास फोटो
हिवाळ्यातील मनमोहक महाबळेश्वर, पाहा खास फोटो(मुंबई Tak/फाइल फोटो)
Published on
(मुंबई Tak)

महाराष्ट्राचं शिमला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) थंडीचा कडाका वाढला आहे.

(मुंबई Tak)
Summary

येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झालं आहे.

(मुंबई Tak)
Summary

महाबळेश्वरमध्ये आता तापमानाचा पारा हा तब्बल 3 ते 4 अंशापर्यंत खाली घसरला आहे.

(मुंबई Tak)
Summary

वेण्णालेक आणि डोंगराळ भागातील परिसरामध्ये पहाटे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिमकण जमा झाल्याचं पाहायला मिळालं.

(मुंबई Tak)
Summary

या हंगामातील ही पहिलीच घटना असून, महाबळेश्वर आता हाडं गोठवणारी थंडीचा अनुभव नागरीक घेत आहेत.

(मुंबई Tak/फाइल फोटो)
Summary

हिमकणाचा स्वर्गीय अनुभव घेण्यासाठी वेण्णालेक परिसरात आता मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत.

(मुंबई Tak/फाइल फोटो)
Summary

महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहायला मिळत आहे.

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in