अंगारकी चतुर्थीनिमीत्त आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दुर्वांची खास आरास करण्यात आली होती.
अंगारकी चतुर्थीनिमीत्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी होते. परंतू सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत.
आजच्या दिवसाचं औचित्य साधून गणपतीला प्रिय मानल्या जाणाऱ्या दुर्वांची आरास विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात करण्यात आली होती.
देवाचा गाभारा, चौखांबी मंडप, सोळा खांबी मंडप, दुर्वांनी न्हाउन निघाला असून त्यामध्ये श्री गणेशाच्या अष्टविनायक प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सण, यात्रा, उत्सव व राष्ट्रीय दिनी विविध रंगबिरंगी फुलांची आकर्षक आरास करण्यात येते.
अंगारखी निमीत्त गणपतीला प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्यही यावेळी दाखवण्यात आला होता.
अनेक भाविक ही सेवा बजावण्यासाठी पुढे येवू लागले आहेत. आजची आरास सेवा पुण्याचे भाविक सचिन चव्हाण यांच्या वतीने करण्यात आली आहे.