Aditya Thackray: ४० गद्दारांना घरच्या पायऱ्या जनता दाखवणार, विधानसभेच्या नाही

सिल्लोडच्या सभेत नेमकं काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे वाचा सविस्तर बातमी
40 Traitors will be shown the steps of the house by the people, not the Legislative Assembly Says Aditya Thackeray
40 Traitors will be shown the steps of the house by the people, not the Legislative Assembly Says Aditya Thackeray

४० गद्दारांना जनता घराच्या पायऱ्या दाखवणार आहे, विधानसभेच्या नाही अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सिल्लोडच्या सभेत टीका केली आहे. आज या मतदार संघात मी आलो आहे तो कृषी मंत्र्यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या तोंडी किती घाणेरडी भाषा आहे तुम्ही पाहिलीत. आज या मतदारसंघात किती राग आहे. हाच राग मला ४० गद्दारांच्या मतदारसंघात दिसतो आहे. त्यामुळे जनता त्यांना घरचा रस्ता दाखवणार याची मला खात्री आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण

महाराष्ट्रात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे. कृषी मंत्री काय बोलत आहेत? मंत्रिपदावर बसलेल्या माणसाच्या तोंडी ही भाषा शोभते का? नाशिक, धुळे या ठिकाणी मी गेलो होतो तिथे कृषी मंत्री कोण हेदेखील माहित नाही. मी इथे जमलेल्या लोकांना आणखी एक विनंती करतो फार ओरडू नका, नाहीतर शेजारी दुसरी सभा आहे तिथले लोक पळून जातील असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनाही टोला लगावला आहे.

आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?

गद्दारांच्या कपाळी जो शिक्का बसला आहे तो गद्दारीचा आहे. तो तसाच राहणार आहे. महाराष्ट्रात हे सगळे ४० च्या ४० गद्दार म्हणूनच ओळखले जाणार आहेत. मला छोटा पप्पू असं नाव दिलं आहे चला आज मी हे नाव स्वीकारतो. जर माझ्या शेतकरी बांधवाला २४ तासात मदत करणार असाल तर माझं नाव छोटा पप्पू हे मी स्वीकारतो असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे आज झालेल्या सभेत चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले.

तुम्ही कुणाला निवडणार?

कृषी मंत्र्यांच्या, अर्थात घटनाबाह्य कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात आज मी गेलो. शेतकऱ्यांना भेटलो. त्यांना आजवर कुठलीही मदत या खोके सरकारने दिलेली नाही. तुम्हाला असे लोक आमदार म्हणून हवे आहेत का? तुम्ही गद्दारांना निवडणार की उद्धव ठाकरेंना? असाही प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी विचारला तेव्हा सगळ्यांनी उद्धव ठाकरे असं एकमुखाने उत्तर दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in