...जेव्हा 5 महिला करतात ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न!

राज्यातील ठाकरे सरकारविरोधात 5 महिला सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणून घ्या कोण आहेत या महिला आणि त्यांनी कशा प्रकारे सरकारला हैराण केलंय.
...जेव्हा 5 महिला करतात ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न!
5 women try to trap thackeray government kangana ranaut amruta fadnavis ketaki chitale jayashree patil navneet rana(फाइल फोटो, सौजन्य: CMO)

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि तिथूनपासून त्यांच्यावर अनेकांनी आरोप करायला सुरुवात केली. त्यातच अशा पाच महिलांनी आतापर्यंत ठाकरे सरकारवर टीका केली, की त्यांची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा झाली. कंगना रणौत, जयश्री पाटील, नवनीत राणा, अमृता फडणवीस, केतकी चितळे या पाचही महिलांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या कंगना राणावत, जयश्री पाटील, नवनीत राणा, अमृता फडणवीस यांनी वेळोवेळी ठाकरे सरकारला टार्गेट केलं. यात प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच होते. म्हणूनच ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या या महिला आणि त्यांच्या वादाबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

आपण सुरुवात करुया कंगना रणौतपासून:

9 सप्टेंबर 2020 रोजी अभिनेत्री कंगना रणौतच्या घरावर BMC ने बुल्डोजर चालवला. अवैध बांधकामावर ही कारवाई होत असल्याची बतावणी पालिका अधिकाऱ्यांनी केली. मात्र, त्यानंतर काही दिवस कंगना रणौतने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर पातळीसोडून टीका केली. त्यात केंद्र सरकारकडून तिला सुरक्षा मिळालीच, मात्र त्या काळात कंगना रणौत ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात चर्चेचा मुद्दा झाली होती.

अमृता फडणवीस वि. ठाकरे सरकार

जेव्हा अतिशय अनपेक्षितरित्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद गमावून विरोधी पक्षनेते पदाचा कारभार स्विकारावा लागला तेव्हापासून त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधणं सुरु केलं आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे असो, सरकारमधील घोटाळा असो की नवाब मलिक, अनिल देशमुखसारख्या मंत्र्यांना जेल असो, अमृता फडणवीसांनी जमेल तिथे जमेल तसं थेट उद्धव ठाकरेंना किंवा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

त्यानंतर मीडियासमोर आल्या त्या अॅड. जयश्री पाटील-सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, त्यामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीची झालेली एन्ट्री हा खूपच चर्चेचा विषय होता. याचदरम्यान शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला आणि वकील सदावर्तेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यात त्यांच्या पत्नी जयश्री पाटलांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना मेन टार्गेट केलं. मात्र, उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या निशाण्यावर होतेच.

नवनीत राणांनी सरकारला दिलं थेट आव्हान!

या सगळ्या गोष्टी संपतायत, न संपतायत तोच नवनीत राणा पुढे येऊन थेट उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हमुमान चालिसा म्हणण्याचा चंग बांधतात. मात्र, ती गोष्ट त्यांना करता आली नाही. त्यामुळे राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली.

पोलीस स्टेशनची पायरी जरी ते चढले असले तरी त्यांनी सरळ सरळ उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचं सोडलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरुनही राणा दाम्पत्याने आणि खासकरुन नवनीत राणांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

कंगना राणावत, अमृता फडणवीस, जयश्री पाटील, नवनीत राणा या चार महिला सातत्याने ठाकरे सरकारला घेरत असतानाच अभिनेत्री केतकी चितळे हिने एक फेसबूक पोस्ट करून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह टीका करताना केतकीने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. आता केतकीवरच अनेक नेत्यांनीही टीका केली. मात्र, ठाकरे सरकारमधील नेत्यांवर टीका करणाऱ्या महिलांच्या यादीमध्ये केतकीचंही नावं आलं आहे.

5 women try to trap thackeray government kangana ranaut amruta fadnavis ketaki chitale jayashree patil navneet rana
अदृष्य हात केतकीला टार्गेट करत आहेत, जामीन अर्जात अभिनेत्रीच्या वकिलांनी काय बाजू मांडली?

त्यामुळे आतापर्यंत 5 महिलांनी ठाकरे सरकारवर टीका केली आणि त्याला उत्तर देण्यासाठी रुपाली पाटील, रुपाली चाकणकर, दिपाली भोसले-सय्यद, किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे अशा महिला मैदानात उतरत आहेत. त्यामुळे आगामी काळात देखील हे द्वंद आणखी तीव्र होत जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in