Agneepath Scheme : ठेकेदारीवर गुलामांना ठेवलं जातं, लष्कराला नाही; संजय राऊत भडकले

देशात सध्या अग्नीपथ योजनेवरुन रणकंदन माजले आहे. आर्मी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut Mumbai Tak

मुंबईः देशात सध्या अग्नीपथ योजनेवरुन रणकंदन माजले आहे. आर्मी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अग्नीपथ योजनेवरुन संबंध देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊतांनी मोदी सरकारवरती निशाणा साधला आहे. सैन्यात अग्नीपथ (Agnipath) योजनेतून ठेकेदारीवर, कंत्राटी पद्धतीने भरती केल्यास संपूर्ण सैन्यदलाची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. भारतीय सैन्यदलाचा, सुरक्षा दलाचा हा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. ठेकेदारीवरती फक्त गुलाम विकत घेतले जाऊ शकतात सैनिक नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

देशाच्या सुरक्षेचे जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे त्यांना ठेकेदारीवरती घेतले जाऊ शकत नाही, त्यांना फक्त नोकरी म्हणून कामावर ठेवणं हा संपुर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे असेही राऊत म्हणाले. दरम्यान भारतीय सैन्यदलात 4 वर्षांच्या भरतीसाठी अग्नीपथ योजना केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली आहे. मात्र देशातील विविध राज्यातून या योजनेला विरोध होत आहे. या योजनेवरती काँग्रेसच्यावतीने टीका करण्यात आली आहे. या योजनेने तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होईल असे काँग्रेस म्हणाले आहे.

१० टक्के आरक्षणाचा निर्णय

केंद्र सरकारच्या मर्यादित काळासाठीच्या लष्करभरतीच्या 'अग्निपथ' योजनेविरुद्ध देशभरात आगडोंब उसळला आहे. तरुणांमधून हिंसक स्वरुपात या योजनेला विरोध होत असून, संताप शमवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने आणखी एक निर्णय घेतला आहे. अग्निपथ योजनेतून निवड झालेल्या अग्निवीरांसाठी नंतर आसाम रायफल्स आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अग्निपथ योजना नेमकी काय आहे?

- भारतीय लष्करात १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरूणांना अग्निवीर म्हणून नोकरी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसह ज्यात त्यांच्या प्रशिक्षणही होणार आहे. त्यासह समाविष्ट केलं जाणार आहे.

- चार वर्षात या सगळ्यांना सैन्याचं म्हणजेच लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे

- यानंतर तुकडीतल्या केवळ २५ टक्के तरूणांनाच सैन्यात भरती करून घेतलं जाईल

- पहिल्या वर्षी ४६ हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती केली जाणार आहे

- या अग्निवीरांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील. भरतीत इच्छुकांना आवश्यक त्या वैद्यकीय पात्रता पूर्ण कराव्या लागतील.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in