
मुंबई: 'मी स्वत: मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, मुख्यमंत्री महोदय तुमचे 55 आणि 6 असे 60 आमदार शिवसेनेचे होतात. 30-30 चा जरी कोटा द्यायचा झाला तरी शक्य आहे. मागच्या वेळेस जो दगाफटका झाला ते बघितल्यानंतर माणूस कसं दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पितं. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही आमदारांना फोन केले. त्यात लपवायचं काय.. आम्ही एकत्रपणे काम करतोय.' असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत बोलताना सांगितलं.
पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:
मी स्वत: मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, मुख्यमंत्री महोदय तुमचे 55 आणि 6 असे 60 आमदार शिवसेनेचे होतात. 30-30 चा जरी कोटा द्यायचा झाला तरी शक्य आहे. मागच्या वेळेस जो दगाफटका झाला ते बघितल्यानंतर माणूस कसं दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पितं. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही आमदारांना फोन केले. मी पण केले. जे 60 लोकं सोडून जे इतर अपक्ष होते जे आघाडीला पाठिंबा देणारे होते शिवसेनेचे सहयोगी अशांना आम्ही पण फोन केले. सीएम साहेबांना स्पष्ट सांगितलं की, मी फोन केला.
पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:
'मी स्वत: मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, मुख्यमंत्री महोदय तुमचे 55 आणि 6 असे 60 आमदार शिवसेनेचे होतात. 30-30 चा जरी कोटा द्यायचा झाला तरी शक्य आहे. मागच्या वेळेस जो दगाफटका झाला ते बघितल्यानंतर माणूस कसं दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पितं. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही आमदारांना फोन केले. मी पण केले. जे 60 लोकं सोडून जे इतर अपक्ष होते जे आघाडीला पाठिंबा देणारे होते शिवसेनेचे सहयोगी अशांना आम्ही पण फोन केले. सीएम साहेबांना स्पष्ट सांगितलं की, मी फोन केला.' असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.
'त्यात लपवायचं काय.. आम्ही एकत्रपणे काम करतोय. नंतर मुख्यमंत्री म्हणाले की, आता हे सगळी आपआपली तयारी करावी आणि शेवटी मी मतदानाच्या वेळेस मी आदेश देणार आहे. कसा-कसा कोटा असावा.' असं अजित पवार म्हणाले.
'मला मागची एक आठवण आहे. या निवडणुकीत पहिलं दुसरंच मत महत्त्वाचं नाही. तीन, चार, पाच हा आकडा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याकरिता आमचा प्रयत्न आहे. 1 आणि 2 आपल्याकरिता घेतल्यानंतर 3 आणि 4 याबाबतीत आम्ही साधारणपणे ठरवू. आम्हाला थोड्या मताची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणाले की, आपण शेवटी बसू आणि निर्णय घेऊ.' असं गणितही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.