'...तर विकेट जाईल', पाहा विधानपरिषद निवडणुकीबाबत अजित पवार काय म्हणाले

विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:
'...तर विकेट जाईल', पाहा विधानपरिषद निवडणुकीबाबत अजित पवार काय म्हणाले
ajit pawar made an important comment regarding the legislative council elections

कमलेश सुतार, मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार असल्याने खूपच चुरस वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षिरित्या विजय मिळविल्याने या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. याचविषयी बोलताना अजित पवार यांनी अगदी सरळसोप्प्या शब्दात सांगितलं की, 'जे 26 चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल.'

विधानपरिषदेवर आपले आमदार निवडून आणण्यासाठी साधारण 26 मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्याचं चित्र पाहता 284 आमदार मतदान करण्याची शक्यता आहे. अशावेळी निवडून येण्यासाठी 26 चा कोटाच असणार आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

पाहा विधान परिषद निवडणुकीबाबत अजित पवार काय म्हणाले:

'नाराजी वैगरे बिल्कुल नाही.. नाराजी.. नाराजी काय बोलत आहात आपण सारखं.. आमच्यामध्ये काहीही नाराजी नाही.'

'मागच्या वेळेस काय झालं होतं की, तिघांचे तीन उमेदवार व्यवस्थित निवडून येऊन तीनही पक्षाकडे मतं काही प्रमाणात शिल्लक होती. त्यामुळे सगळ्यात तेव्हा एकत्र बसून निर्णय घेणं गरजेचं होतं. म्हणून तेव्हा एकत्र बैठक झाली. पण आता प्रत्येकाला आपआपल्या संख्याबळावरच उमेदवार निवडून आणायचे आहेत.' असं अजित पवार म्हणाले.

ajit pawar made an important comment regarding the legislative council elections
Nana Patole: ''आमच्या आमदारांना धमक्या येत आहेत, सर्व रेकॉर्डिंग लवकरच बाहेर काढू''

'अपक्ष हे 5 लाख लोकांचं नेतृत्व करतात. त्यांना त्यांचा मानसन्मान दिला पाहिजे. त्यांचं मत मागितलं पाहिजे. लोकशाहीमध्ये अशाप्रकारे आरोप-प्रत्यारोप करुन मार्ग निघत नाही. यावेळेस आम्ही सगळे जण अपक्षांशी संपर्क साधून तसं ते मत मिळवता याचा प्रयत्न सुरु आहे.' असं म्हणत अजित पवारांनी एक प्रकारे संजय राऊतांनाच टोला हाणला आहे.

'अपक्षांचं मत आम्हाला कसं मिळेल असा प्रयत्न आम्ही करत आहोत. तसाच विरोधकही करत आहेत. एक गोष्ट आहे की, 11 पैकी 10 उमेदवारच निवडून येणार एक जण पराभूत होणार आहे. त्यामुळे तो चमत्कार होईल तो सोमवारी दिसेलच. जे 26 चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल.' असं रोखठोक मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in