Ajit Pawar-Nitin Gadkari : अजित पवार नितीन गडकरींना घरी जाऊन का भेटले?

Ajit Pawar nitin gadkari meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल दिली माहिती
Ajit Pawar-Nitin Gadkari : अजित पवार नितीन गडकरींना घरी जाऊन का भेटले?
अजित पवार आणि नितीन गडकरी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घरी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अचानक भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चा होत आहे. दरम्यान, गडकरींची भेट आणि या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी राज्यातील पोलीस सक्षम आहे. कुणाला सभा घ्यायची म्हटलं, तर त्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे. सभा घेत असताना त्यातून वातावरण खराब होणार नाही. सभा कशी असेल त्यात काय होणार हे सगळं विचारून पोलिसांनी परवानगी दिली आहे," असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "मागच्या काळात पुण्यातील सर्किट हाऊस मी उपमुख्यमंत्री असताना पूर्ण झालं. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उद्घाटन केलं. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामध्ये एवढा काही मानून घेण्याचं कारण नाही."

गडकरींसोबत काय चर्चा झाली?

नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबद्दलही अजित पवारांनी माहिती दिली. "नितीन गडकरी यांच्या जाण्याचं कारण म्हणजे सेंटर रोड फंड. हा फंड दरवर्षी केंद्र सरकारकडून दिला जातो. गेल्यावर्षी महाराष्ट्राला बाराशे कोटी रुपये तो मिळाला होता. त्यावर गडकरी साहेब म्हणाले, ६०० कोटी रुपयांचं काम महाविकास आघाडी सरकारनं सुचवावं आणि ६०० कोटीची कामं भाजपच्या आमदारांनी सूचवावी. शेवटी महाराष्ट्रात बाराशे कोटी रुपये केंद्राचा निधी आला म्हणून मुख्यमंत्री मी आणि सगळ्यांनी निर्णय घेतला. यातून भाजप आमदारांच्या क्षेत्रातील कामं आणि महाविकास आघाडीच्या आमदारांच्या क्षेत्रातील काम करायची आहे म्हणून ते पैसे आपण खर्च केले."

"आता नवीन वर्ष सुरु झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा काही निधी आपण देऊ शकाल का? तो निधी त्यांना थेट देता येत नाही. केंद्राला राज्याला द्यावा लागतो आणि राज्य त्याचं वाटप करते. समन्वय असावा. विकास कामात कुठे राजकारण येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली," अशी माहिती अजित पवारांनी दिली.

"राज्य महामार्गांमध्ये आरओबी आणि आरओयू करायचा असेल तर ते नाव सूचवा तुम्हाला निधी देऊ. काही रिंग रोडचे काम, रस्ते विकास महामंडळ आणि नॅशनल हायवे यांचा समन्वय साधून कशाप्रकारे काम करता येईल. नवीन टेक्नॉलॉजी आलीये. ती टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल याविषयी चर्चा झाली. याचा वापर कसा करता येईल याचा विचार राज्य सरकारने करण्याबद्दल चर्चा झाली," असंही अजित पवार म्हणाले.

"गॅस वरचा कर आम्ही तीन टक्के कमी केला आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये येणारा टॅक्स गॅसचा दर महाराष्ट्रातील लोकांना परवडावं म्हणून आम्ही केला आहे. याविषयी मी काल सांगितलेला आहे, वन नेशन वन टॅक्स केंद्राने लावला. त्या धर्तीवर विचार करावा आणि जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्याच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन केंद्राचा टॅक्स किती आणि राज्याचा किती या पद्धतीने विचार करता येतो तसा करावा," असं अजित पवार कर कपातीबद्दल म्हणाले.

Related Stories

No stories found.