अमित शाह-एकनाथ खडसेंची भेट, भाजपात जाण्याची चर्चा, नाथाभाऊंनी टीकाकारांनाच खडसावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनिष जोग, प्रतिनिधी

जळगाव: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतली. त्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खडसेंचे कट्टर विरोधक असलेले मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे आणि भाजप खासदार रक्षा खडसे या दोघांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे भर भाषणात सांगितले होते. त्यावेळी त्यांनी खडसे भाजपमध्ये जाणार तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली होती.

अमित शाहांच्या भेटीवर काय म्हणाले एकनाथ खडसे?

एकनाथ खडसेंनी अमित शाहांच्या भेटीनंतर टीकाकारांनाच खडसावलं आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. मी ज्यावेळी दिल्लीत जातो त्यावेळी अमित शाह, राजनाथ सिंग, पियुष गोयल, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांना भेटत असतो. हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे त्यांच्याशी संबंध आहेत. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटेल मग त्याचा लगेच चुकीचा अर्थ काढू नका, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खासदार रक्षा खडसे काय म्हणाल्या?

खडसे-शाहांच्या भेटीवरुन वातावरण तापलेलं असताना खडसेंच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी यावर आपलं मौन सोडलंस आहे. एकनाथ खडसे आणि अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलो होतो पण कार्यक्रम व्यस्ततेमुळे भेट होऊ शकली नाही. मात्र फोनवर अमित शाह आणि एकनाथ खडसेंचे बोलणं झालं आहे, भेट झाल्याचं लोक राजकारण करणारच, मी भाजपमध्येच आहे आणि एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीतच आहेत असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. फोनवरती नक्की काय बोलणं झालं हे बोलणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे.

आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाषणात अमित शाह आणि एकनाथ खडसेंच्या भेटीची बातमी सांगितली, त्यानंतर चर्चांना उधान आलं. परंतु एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया आल्यावर चंद्रकांत पाटलांनी त्यांची सारवासारव केली. एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, माध्यमांमध्ये त्याची चर्चा होते म्हणून मी बोलल्याचं पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT