शहांच्या मुंबई दौऱ्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार; कोणाला आशीर्वाद मिळणार?

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याही घरी जाणार...
amit shah
amit shahMumbai Tak

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शहा पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत असल्याने संपुर्ण राजकीय वर्तुळाचे त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. शहांचा दौरा खास गणेशोत्सवानिमित्त असला तरीही या दौऱ्यातील काही राजकीय गणितही जुळवली जाण्याची शक्यता आहे. कारण अधिवेशनानंतर प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार, आगामी काळातील मुंबई आणि राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका अशा सर्व मुद्यांवर या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

अमित शहांचा मुंबई दौरा :

अमित शहा हे गणेशोत्सवादरम्यान नियमितपणे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ते मुंबईत येवू शकले नव्हते. मात्र आता ते मुंबई दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याही निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत.

amit shah
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर; भरत गोगावले म्हणाले, '4 ते 5 वर्ष ठरणार नाही'

मंत्रीपदासाठी इच्छुकांना अमित शहांचा आशीर्वाद मिळणार?

दरम्यान, या दौऱ्यात राजकीय चर्चा होण्याचीही दाट शक्यता असून ही चर्चा प्रामुख्याने दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ मंत्र्यांना स्थान देण्यात आले होते. मात्र त्या विस्तार स्थान न मिळालेल्या नेत्यांमध्ये नाराजी असून सप्टेंबरमध्ये पुन्हा विस्तार करण्याचे आश्वासन देऊन नाराज नेत्यांची समजूत काढण्यात आली आहे. आता विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे.

amit shah
'त्या' ऑफरवर नितीन गडकरी म्हणाले, 'विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही'

सुत्रांच्या माहितीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अमित शहा हे त्यापूर्वी म्हणजे ५ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याने नव्या मंत्र्यांच्या नावांबाबत चर्चा होणार हे नक्की आहे. यात पहिल्यांदा डावलेल्या आणि नाराज असलेल्या काहींना कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यातही मंत्रिपद मिळविण्यासाठी अनेकांनी लॉबिंग केले असल्याने कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in