Amol Mitkari: शरद पवारांचा व्हिडिओ ट्विट करत मिटकरींचा नारायण राणेंना इशारा, 'धमकीवीरांसाठी पवार...'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत यावच लागेल, त्यांच्यावर कारवाई होणरच असे वक्तव्य केले होते.
Amol Mitkari: शरद पवारांचा व्हिडिओ ट्विट करत मिटकरींचा नारायण राणेंना इशारा, 'धमकीवीरांसाठी पवार...'
Narayan Rane | Amol Mitkari Mumbai Tak

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत यावच लागेल, त्यांच्यावर कारवाई होणरच असे वक्तव्य केले होते. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणेंनी ट्विट करत शरद पवारांना धमकीवजा इशारा दिला आहे. शरद पवारांना धमकी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून आता संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. विधान परिषदेचे आमदार अमोर मिटकरी (Amol Mitkari) यांनी शरद पवारांचा जूना व्हिडिओ ट्विट केला आहे. ''धमकीविरांसाठी पवार साहेबांचा मोलाचा सल्ला.'' असे त्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

शरद पवारांचा तो व्हिडिओ 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा आहे. संबंधित व्हिडीओ इंदापूर येथील प्रचारसभेचा आहे. शांत आहे तोपर्यंत शांत आहे, जर आडवा पाय टाकला तर दम देणाऱ्याचे पाय काढले जातील, असे पवार या व्हिडीओमध्ये बोलत आहेत. अमोल मिटकरी आमदार तर आहेतच त्याचबरोबर ते पक्षाचे प्रवक्ते देखील आहेत, त्यामुळे ते नेहमी आपली प्रतिक्रिया देत असताता.

काय म्हणाले होते शरद पवार?

'' महाराष्ट्राबाहेर गेलेले आमदार जेव्हा पुन्हा राज्यात येतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल असं शरद पवार म्हणाले होते. अडीच वर्षे महाविकास आघाडीने उत्तम कारभार केला, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला असं म्हणंण चुकीचं आहे.''

महाराष्ट्रात याअगोदर अशी स्थिती कधी पाहिलेली नाही. बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात यावंच लागेल तेव्हा बहुमत कोणाच्या बाजूने आहे ते स्पष्ट होईल असेही शरद पवार म्हणाले होते.

Narayan Rane | Amol Mitkari
"बंडखोर आमदार महाराष्ट्रात येतील तेव्हा..." वाचा काय म्हणाले शरद पवार

नारायण राणे काय म्हणाले?

'आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही.

संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा.

माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.

सन्माननीय नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत, ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे.

अशा आशयाचे ट्विट नारायण राणेंनी केले आहे. राणेंनी शरद पवारांना धमकीवजा इशारा दिला आहे. बंडखोरी करुन गेलेले आमदार महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्या केसालाही धक्का लावला तर घर गाठणे कठिण होईल असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे

Narayan Rane | Amol Mitkari
नारायण राणेंचा शरद पवारांना धमकीवजा इशारा; 'आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास...'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in