NOTA ला जास्त मतं पडली असती तरीही ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित होता! समजून घ्या कारण

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी घोषित झाला. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ ला 12 हजार 776 मतं मिळाली. अंधेरीच्या मतदारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटाचा पर्याय स्वीकारल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मात्र अंधेरीच्या निवडणुकीत नोटा चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी या निवडणुकीत भाजपच्या मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपकडून नोटाचा प्रचार सुरु असल्याचा आरोप झाला होता. याबाबतच्या काही कथित क्लिप देखील व्हायरल झाल्या होत्या. आज मुरजी पटेल यांनी या सर्व आरोपांच खंडन केलं. तसंच भाजपची मत किती आहेत, हे तुम्हाला महापालिका निवडणुकीत दिसेल, असं आव्हानही दिलं.

ऋतुजा लटके यांच्या विजयाचं गणित :

मात्र या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आपल्यााला एक गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे, निकालात नोटा पर्यायाचा विजय झाला असता तरी सध्याच्या मतांच्या आकडेवारीनुसार अखेरीस निवडणूक आयोगाला ऋतुजा लटके यांनाच विजयी घोषित करावं लागणार होतं. याचं कारण आहे नोटाचा नियम.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाच्या 2013 मधील एका आदेशानुसार 2014 च्या लोकसभा निवडणुकांपासून भारतात ‘नोटा’ अर्थात none of the above हा पर्याय अस्तित्वात आला. यानंतर मतदारांना मतपत्रिकेमधील एकाही मतदाराला आपलं मत द्यायचं नसल्यास नोटा या पर्यायाला मत देता येतं. यामुळे मतदारांचा मतदानाचा हक्कही बजावला जातो आणि उमेदवारांना नाकारल्याचा संदेशही देता येतो.

काय आहे नोटाचा नियम?

नोटाच्या नियमानुसार नोटाला सर्वाधिक मतं पडल्यास क्रमांक दोनची मतं मिळविणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. पण तिथली निवडणूक रद्द होतं नाही. नोटाला सर्वाधिक मतं असतील तर तिथली निवडणूक रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. याच या नियमानुसार नोटाला सर्वाधिक मत मिळली असती तरी क्रमांक दोनच्या उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांचा विजय झाला असता.

ADVERTISEMENT

राज्यात घेतली जाते फेरनिवडणूक :

महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाने नोटा जिंकल्यास एकदा फेरनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसऱ्यांदा होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा नोटा जिंकल्यास क्रमांक दोनचा उमेदवारच विजयी घोषित केला जातो. 2019 मध्ये आयोगाने हा निर्णय घेतला होता. परंतु राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला असल्याने तो केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागू होतो.

ADVERTISEMENT

नोटा आणि आजवरची सर्वाधिक मत :

  • लोकसभेसाठी – बिहारच्या गोपाळगंज मतदारसंघात 2019 मध्ये 51 हजार 660 मतं नोटाला मिळाली होती.

  • विधानसभेसाठी- महाराष्ट्राच्या लातूर ग्रामीण मतदारसंघात 2019 मध्ये 27 हजार 500 मतं नोटाला मिळाली होती.

  • तर एखाद्या राज्यात सर्वाधिक मतं नोटाला जाण्याचा विक्रम हा महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 सालच्या निवडणुकीत घडला होता.

  • 2019 साली राज्यभरातील जवळपास 7 लाख 42 हजार 134 मतदारांनी नोटाला मतदान केलं होतं.

    • follow whatsapp

      ADVERTISEMENT