‘घ्यायचा तर घ्या, नाहीतर सोडून द्या’, फडणवीसांना पत्र लिहिण्याचं राज ठाकरेंनीच सांगितलं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्यावरून विविध प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप-मनसेत पडद्यामागे काहीतरी घडत असल्याचंही बोललं जात आहे. यावर राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली.

मुंबई एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, ‘रमेश लटके चांगला माणूस गेलाय. अशा परिस्थिती त्याच्या पत्नी (ऋतुजा लटके) जर तिथं उभ्या राहत असतील, म्हणून मी फक्त देवेंद्रजींनी विनंती केली की अशा सगळ्या परिस्थितीत आपण कशासाठी एकच तर निवडणूक आहे.’

‘२०२४ लाच विधानसभेच्या निवडणुका आहेत. वर्षभरासाठी आपण कशासाठी या गोष्टी करतोय. त्यामुळे मी त्यांना विनंती केली की, जर समजा त्यांनी निवडणूक नाही लढवली, तर आज महाराष्ट्रात जे चित्र उभं राहिलंय, त्यात एक चांगला संदेश निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात जाईल. पुढे राजकारणात येणाऱ्या आणि आता असलेल्या लोकांपर्यंत संदेश जाईल की, अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्र विचार करतो आणि इतर राज्य. यात महाराष्ट्रातलं वेगळेपण मला वाटतं या निवडणुकीत दिसेल, जर उमेदवार उभा केला नाही तर.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘एक गोष्ट लक्षात घ्या की, तो एक वेगळा पक्ष आहे. तो पक्ष मी नाही चालवत. मी फार फार तर विनंती करू शकतो. मुंबईमध्ये रमेशशी असलेले संबंध यापुरताच माझा या विषयाशी संबंध होता. याच्या पलीकडे मी भाजपच्या राजकारणात ढवळाढवळ करू शकत नाही. माझा तो संबंधही नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचे सल्ले देऊ शकणार नाही. देणारही नाही.’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या पत्राचं स्वागत करताना त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची ही मिलीभगत आहे, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘त्यांना काय समजायचं ते समजू द्या. एखाद्याला कावीळ झाली असेल, तर त्याला जग पिवळं दिसायला लागतं. त्याला आपण काही करू शकत नाही. मी स्वच्छ मनाने काही गोष्टी केल्या. सांगितल्या. घ्यायच्या तर घ्या नाही, तर सोडून द्या. मी थोडा उमेदवार उभा करतोय’, अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसेची भूमिका स्पष्ट केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT