वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लष्कराच्या अग्निपथ योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

केंद्र सरकारने लष्कराच्या भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला जोरदार विरोध होत आहे. असं असताना आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लष्कराच्या अग्निपथ योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
army agneepath scheme found in midst of controversy bjp leader devendra fadnavis big revelation

मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने लष्करातील भरतीसाठी 'अग्निपथ' ही नवी कंत्राटी योजना सुरु केली आहे. ज्यामुळे आता देशातील विविध भागात याविरोधात जोरदार आंदोलनं करण्यात येत आहेत. बिहारीमध्ये तर अनेक ठिकाणी रेल्वे जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे या योजनेबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. याचबाबत राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या योजनेबाबत एक मोठा खुलासा केला.

अग्निपथ ही अतिरिक्त योजना आहे. लष्करासाठी जी नेहमीची भरती होते ती होणारच आहे. त्यामुळे ज्या काही थोड्या लोकांनी या योजनेला विरोध केला आहे तो फक्त गैरसमजुतीतून केला आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत यावेळी बोलत होते.

पाहा देवेंद्र फडणवीस अग्निपथ योजनेबाबत नेमकं काय म्हणाले:

'फार थोड्या लोकांनी विरोध केला आहे अग्निपथ योजनेला. ज्या लोकांना विरोध केला आहे त्यांनी गैरसमजुतीतून विरोध केला. त्यांना असं वाटलं की, रेग्युलर भरती बंद होऊन आता केवळ अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होणार आहे. या उलट अग्निपथ ही अतिरिक्त योजना आहे.' असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

'अग्निपथ योजनेमध्ये चार वर्षापर्यंत त्यांना सैनिकी शिक्षण घेता येणार आहे. सैनिकांचं काम करता येणार आहे 21 वर्षाच्या आतल्या वयोगटातील मुलांना हे करायचं आहे. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रिमूनेशनर मिळणार आहे. 4 वर्षानंतर लम्पसम अमांउट देखील मिळणार आहे. त्यातील जे सैन्यात जाण्यास इच्छुक असतील अशा लोकांना सैन्यात प्राधान्यही मिळणार आहे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारची ही योजना कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

army agneepath scheme found in midst of controversy bjp leader devendra fadnavis big revelation
इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' नॅशनल वॉर मेमोरियलजवळच्या ज्योतीमध्ये विलीन

'रेग्युलर भरती काही बंद केलेली नाही. अग्निपथ ही योजना अतिरिक्त आहे. आमच्याकडे सैनिकी बाणा तरुणांमध्ये निर्माण झाला पाहिजे याकरिता तयार केलेली योजना आहे. ज्या लोकांना ते लक्षात आलं नाही अशा काही लोकांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. पण आता जसजसं त्याबाबत समजत चाललं आहे तसं लोकं त्याचं मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत करत आहेत.' असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in