'भोंग्यांचा वाद हे दोन भावांचं भांडण', राज्यातील 6 मुद्द्यांवर ओवेसी काय म्हणाले?

loudspeaker controversy : खासदार असदुद्दीन ओवेसींनी नवनीत राणा, रवी राणा प्रकरणावरही केलं भाष्य
'भोंग्यांचा वाद हे दोन भावांचं भांडण', राज्यातील 6 मुद्द्यांवर ओवेसी काय म्हणाले?
asaduddin owaisi on loudspeaker controversy

राज्यात सध्या भोंगे आणि हनुमान चालीसा वाद गाजत आहे. हा वाद दोन भावांतील भांडणं असल्याचं विधान एआयएमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसींनी नवनीत राणा, रवी राणा यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दलही भाष्य केलं.

एआयएमआयएमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीला असदुद्दीन ओवेसी उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

asaduddin owaisi on loudspeaker controversy
Raj Thackeray : राज ठाकरेंनी औरंगाबादेतील सभेसाठी हेच मैदान का निवडलं?

भोंग्यांचा वाद...

भोंगे हटवण्याच्या वादावर ओवेसी म्हणाले, 'हा दोन भावांमधील झगडा आहे आणि संजय राऊत यांनी दोन्ही भावांना एकत्र बसवून हे भांडणं मिटवायला हवं."

'हे संविधान आणि न्यायपालिकेसाठी धोक्याचं'

खासदार ओवेसींनी भाजपवरही टीका केली. 'जिथे-जिथे भाजपचं सरकार आहे, तिथे कायद्याचं राज्य नाहीये. त्या प्रत्येक राज्यात बुलडोजरचं राज्य सुरू आहे. हे मुस्लिमांसाठी योग्य नाही. अशा प्रकारचं वातावरण संविधान आणि न्याय पालिकेसाठी धोकादायक आहे. या परिस्थितीबद्दल पंतप्रधान मोदींनी बोलायला हवं,' असं त्यांनी सांगितलं.

asaduddin owaisi on loudspeaker controversy
मुस्लिम समाजाला कुणीही पंचिंग बॅग समजू नये, असदुद्दीन ओवेसींचा इशारा

राज ठाकरेंच्या सभेला विरोध

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. या सभेला ओवेसींनी विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार जलील यांनी यावर आधीच विरोध दर्शवला आहे. यावर ओवेसी म्हणाले, 'औरंगाबादसह संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.'

नवनीत राणा-रवी राणांबद्दल ओवेसी काय म्हणाले?

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेलं असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. गेल्या आठवड्यात गाजलेल्या या प्रकरणावर ओवेसी म्हणाले, 'जर मी आणि खासदार इम्तियाज जलील पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर कुराणचं पठण करायला गेलो, तर सर्व सुरक्षा यंत्रणांना बोलवून गोळ्या घालतील,' असं सांगतानाच राणा दाम्पत्यावर लावण्यात आलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल ओवेसी म्हणाले, 'राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध करणं खूप अवघड आहे.'

asaduddin owaisi on loudspeaker controversy
मशिदींवरच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसाच का? राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले....

जयंत पाटलांवर ओवेसी का भडकले?

'एआयएमआयएम महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू इच्छित आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यांना स्वप्नातही ओवेसी दिसत असेल, तर त्याला मी काही करू शकत नाही. अजित पवार कधी भाजपत जाणार आहेत. यापूर्वीही त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं, त्यावेळी त्यांनी विचारलं होतं का?,' असा टोलाही ओवेसींनी लगावला.

संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप

असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. 'संजय राऊत हे राज ठाकरे यांना हिंदूचे ओवेसी म्हणाले. राऊतांनी अशा प्रकारची विधानं करायला नको. शिवसेनाप्रमुखही ओवेसीच होते. मग राऊतांनी असं विधान का केलं, माहिती नाही?,' असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.