Asha Mamidi : '...तर आम्ही सुषमा अंधारेंना चोप देऊ'; शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या, 'अंधारे माकडीण'

Asha Mamidi Vs Sushma Andhare News : ठाकरे आणि शिंदे गटातील दोन उपनेत्यांमध्ये राजकीय 'वार'
asha mamidi warns sushma andhare
asha mamidi warns sushma andhare

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे सातत्यानं बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट), एकनाथ शिंदे आणि आमदारांना डिवचताना दिसत आहे. सुषमा अंधारे यांच्याकडून होत असलेल्या टीकेला आता काही आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या आणि शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामिडी यांनी प्रत्युत्तर दिलंय.

'मुंबई Tak'ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या नेत्या आशा मामिडी यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्राण्यांच्या उपमा देत टीका केलीये. सुषमा अंधारे या वाघीण नाही, तर माकडीण आहेत, अशा शब्दात आशा मामिडी यांनी खोचक टीका केलीये.

आशा मामिडी म्हणाल्या, 'सुषमा अंधारेंनी आरशात बघावं आणि दुसऱ्यांना माकड म्हणावं. पक्षात त्यांचं योगदान काय आहे? प्रसिद्धीसाठी त्या कुणावरही काहीही बोलत आहेत. अंधारे या फक्त टीका करत आहेत. सुषमा अंधारे सुपारी घेऊन काम करत आहेत', अशा शब्दात आशा मामिडींनी सुषमा अंधारेंवर टीकास्त्र डागलंय.

asha mamidi warns sushma andhare
शिवसेनेत प्रवेश करताच उद्धव ठाकरेंकडून 'प्रमोशन'; कोण आहेत सुषमा अंधारे?

सुषमा अंधारेंवर टीका करताना आशा मामिडींचा उद्धव ठाकरेंना टोला

सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना आशा मामिडी यांनी थेट ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय. 'उद्धव ठाकरेंनी उजेड बाजूला केला आहे आणि अंधार जवळ केला आहे.'

सुषमा अंधारे यांचा हिंदू धर्मावर टीका करणारा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामुळे वारकरी संघटनाही आक्रमक झालेल्या आहेत. यावर आशा मामिडी म्हणाल्या, 'सुषमा अंधारे यांना आम्ही रामायण आणि महाभारत ग्रंथ भेट देणार आहोत.'

सुषमा अंधारे यांना चोप देऊ -आशा मामिडी

ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे या सातत्यानं शिंदे गटाला डिवचताना दिसत आहे. तसेच भाजपवरही टीका करताना दिसत आहेत. सातत्यानं टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंना चोप देण्याचा इशारा आशा मामिडी यांनी दिलाय.

asha mamidi warns sushma andhare
सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार? हकालपट्टीच्या मागणीनंतर वारकऱ्यांची पोलिसांत तक्रार

'सुषमा अंधारेंना वेळ पडली, तर चोप देऊ. पळता भूई त्यांना कमी पडेल. महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही. सुषमा अंधारे या वाघीण नाही, तर माकडीण आहेत. सुषमा अंधारे तिसरी राक्षस आहे. उद्धव ठाकरे गट संपवायला त्या निघाल्या आहेत. सुषमा अंधारे डुकरीन आहे. उद्धव ठाकरे गटात गटबाजी असून, सुषमा अंधारे शिवसेना संपवायला आली आहे', अशी टीका आशा मामिडी यांनी सुषमा अंधारेंवर केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in