…तर देवेंद्र फडणवीसांचा सत्कार करू : संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis
Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis
social share
google news

Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सत्काराची भाषा केली आहे.यासह बाजार समितीचा निकाल, अमित शाह (Amit Shah) यांचा दौरा आणि बीकेसीतील महाविकास आघाडीची सभा या सर्व मुद्यांवर पत्रकारांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाविकास आघाडीला बाजार समित्यांमध्ये निर्विवाद यश मिळाले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. या निकालात महाराष्ट्राचा शेतकरी सरकारला वैतागला असल्याचे दिसून येत असून सरकारला कंबरड्यात ही पहिली लाथ मारल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. (bazar samiti election sanjay raut riticize devendra fadnavis)

विशेष म्हणजे मिंदे गटात जे आमदार, मंत्री आहेत, त्यांच्याच मतदार संघात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पॅनेल विजयी झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. पारोळा, मालेगाव, बुलढाण्यात शिवसेनेचे पॅनेल विजयी झालेत असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. ही फक्त सुरुवात आहे, आता विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिका निवडणूकीतही महाविकास आघाडीला यश येईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुंबईच्या सभेची तयारी, सभेचा अवाका, सभेचा जोश पाहण्यासाठी देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आल्याचा टोला संजय राऊत यांनी अमित शाह यांना लगावला आहे.

हे ही वाचा : भाजपचा विजय अन् महाविकास आघाडीचा पराभव : राष्ट्रवादीचा नेता तुफान नाचला…

उद्धव ठाकरेंना बारसूत अडवून दाखवा

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना कोकणात पाय ठेवू दिला जाणार नाही ही धमकी आहे. अशा धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही. तसेच उद्धव ठाकरे अनेकदा कोकणात गेले आहेत, आणि यावेळेलाही जातील, हिम्मत असेल तर अडवू दाखवा, असे चँलेंज राऊत यांनी यावेळेला दिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

देवेंद्र फडणवीस काल मॉरिशसला होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकला म्हणून त्यांना आनंद झाला,पण बेळगावमधून शिवाजी महाराजांचा भगवा वारंवार उतरला जातो, त्यासंदर्भात त्यांनी काय भूमिका घेतली, असा खोचक सवालच संजय राऊत यांनी उपस्थिते केला.तसेच फडणवीस जर मराठी एकिकरणाच्या प्रचारात सहभागी झाले तर आम्ही त्याचा सत्कार करू,असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. आहे का हिम्मत, आम्ही चाललोय, असेही राऊत म्हणाले.

हे ही वाचा : विरोध नसतानाही वेदांता फॉक्सकॉन,एअरबस प्रकल्प…,संजय राऊतांचा रोखठोक सवाल

    follow whatsapp

    ADVERTISEMENT