शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा शिवसैनिक छातीचा कोट करून शिवसेना वाचवायला उभा आहे -भास्कर जाधव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करताना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याचं आव्हान केलं.

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले…

“गेले आठ दिवस मी झोपलेलो नाही. मी कधी विचलित होत नाही. अस्वस्थ होत नाही. पण मी माझा चेहरा लपवू शकत नाही. मी कशामुळे विचलित आहे माहितीये का? एकनाथ शिंदे आजही सभागृहात सांगत आहेत की, मी शिवसेनेचा आहे. आजही सांगताहेत की, मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आजही सभागृहात सांगताहेत की आनंद दिघेंचा सच्चा वारसदार आहे. मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंना सांगायचंय…”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“एकनाथरावजी (Eknath Shinde)आपण आज मुख्यमंत्री झालात. आपण शिवसेनाप्रमुखांचं नाव घेता, आपण शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक आहात. खरं बघितलं तर आपली उठबस झालेली नाही. या सभागृहात आपण दोन-तीन टर्म समोरासमोर येत होतो. मान तिरकी करून चालण्याची सवय आहे. तुम्ही समोर आलात आणि तुम्हाला जय महाराष्ट्र म्हटलं की तुम्ही जय महाराष्ट्र म्हणायचात. तुम्ही कधी माझ्याशी बोलत नव्हतात.”

“मी शिवसेनेत आलो. तुमची गटनेतेपदी निवड झाली आणि मी तुमचा सत्कार केला. एकनाथरावजी शिंदे तुमच्याकडे जे एमएसआरडीचं कार्यालय होतं. तिथे मी दोनवेळा आलो, तिथे एकदाच आपली भेट झाली. तुमच्या नंदनवन बंगल्यावर दोन वेळा आलो. दोनवेळा भेट झाली. मंत्रालयातील तुमच्या दालनात चार पाच वेळा आलो, तिथे एकदाही भेट झाली नाही. तरीदेखील आपण करत असलेलं काम, आपण करत असलेली जनसेवा, तळागाळातील प्रत्येकाला मदत करण्याची पद्धत मी बघितली. कोकणात महापूर आला. त्यांच्यामधील खरा शिवसैनिक असल्याची साक्ष तुमच्या कृतीने दिली, हे मी जाहीरपणे कबूल करतो. प्रत्येकाशी बोलत असताना तुम्ही अनेक प्रकारे मदत करता. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाता ही वस्तुस्थिती आहे.”

“निवडणुकीच्या पूर्वी तुमचा माझा कधी परिचय झाला नाही. आपण कधी भेटलो नाही, आपण कधी बोललो नाही. नंतरच्या छोट्या कालावधीमध्ये सुद्धा आपलं खूप मोठं काम मी बघितलं. एकनाथरावजी आपण जे बाळासाहेबांचं नाव सांगता, आनंद दिघेंचं नाव सांगता, शिवसेनेचं नाव सांगता. त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आलीये.”

ADVERTISEMENT

“काय झालंय या शिवसेनेमध्ये… एका बाजूला ४० शिलेदार तुमच्या बाजूने उभे आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचा शिवसैनिक छातीचा कोट करून शिवसेना वाचवायला उभा आहे. कोण कुणाच्या विरोधात लढणार आहे? कोण कुणाच्या विरोधात लढणार आहे? कोण कुणावर घाव घालणार आहे? कोण कुणाला रक्तबंबाळ करणार आहे? कोण कुणाला घायाळ करणार आहे? कोण कुणाला धारातिर्थी पाडणार आहे ? याचा विचार करा… ही जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपली आहे.”

“माणसाने एकदा का लढा पुकारला, माणसाने एकदा का आंदोलन हातामध्ये घेतलं, माणसाने एखादी लढाई स्विकारली तर लढाई लढण्यापूर्वी मला थांबायचं कुठेय हे ज्याला कळतं तो खरा योद्धा. तो यशस्वी नेता. मला माहितीये. तुमच्या मनात अनंत दुःख असतील, ती तुम्ही इथे मांडणार असाल. याबद्दल मला काहीही म्हणायचं नाहीये. मला काही म्हणायचं नाहीये.”

ADVERTISEMENT

“तुमच्याबद्दल यांना काहीही प्रेम आलेलं नाही. याची मी अनेक उदाहरण मी सांगू शकेन. म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, मी आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची, यासाठी प्रसंगी दोन पावलं माघारी या आणि तुम्ही जर याठिकाणी शिवसेना फुटू दिली नाही. वाचून दिली, तर हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT