५ आणि ६ मे रोजी हजर राहा! भीमा कोरेगाव आयोगाने शरद पवारांना बजावलं समन्स

जाणून घ्या काय म्हटलं आहे आयोगाने?
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. India Today

५ आणि ६ मे रोजी हजर राहा असं म्हणत भीमा कोरेगाव आयोगाने शरद पवारांना समन्स बजावलं आहे. दक्षिण मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात हजर राहण्यासंबंधीचा उल्लेख यामध्ये आहे. शरद पवार यांनी एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही दाखल केलं आहे.

शरद पवार
शरद पवार

याआधी फेब्रुवारी २०२२ मध्येही साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवारांना बोलवण्यात आलं होतं. ३१ डिसेंबर २०१७ ला जी एल्गार परिषद बोलवण्यात आली होती त्याबद्दलही साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. आता शरद पवारांना आयोगाने समन्स बजावत ५ आणि ६ मे रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
शरद पवार आणि १९९३चा बॉम्बस्फोट; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं होतं?

काय आहे प्रकरण?

१ जानेवारी २०१८ या दिवशी पुण्याजवळ असलेल्या भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत. शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती.

या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी केली होती. हिंसाचार झाला तेव्हा राज्यात भाजपाप्रणित सरकार सत्तेत होते आणि तेव्हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी केला होता.

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
हिंदू-मुस्लिम दंगा घडवण्याचे प्रयत्न केले जाताहेत; शरद पवार यांचं गंभीर विधान

भीमा कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ एल्गार परिषदेच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी गावात हिंसाचार झाला होता. काही संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. नंतर जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरुण फेरेरा, वेर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव या नऊ कार्यकर्त्यांना हिंसाचारात अटक करण्यात आली. यातल्या सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
भीमा कोरेगाव प्रकरण : सुधा भारद्वाज यांना अखेर बॉम्बे हाय कोर्टाकडून दिलासा

१ जानेवारी २०१८ ला काय घडलं होतं?

१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in