ED: किरीट सोमय्या अगदी ठामपणे म्हणाले.., 'अनिल परबला अटक होणारच!'

अनिल परब यांना अटक होणारच असा दावा किरीट सौमय्या यांनी केला आहे. परबांवर ईडीच्या कारवाई सुरु असातानाच सोमय्यांनी हा दावा केला आहे.
bjp leader kirit somaiya said very emphatically shiv sena minister anil parab will be arrested
bjp leader kirit somaiya said very emphatically shiv sena minister anil parab will be arrested

मुंबई: शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणी छापेमारी केली आहे. याचा प्रकरणात अनिल परब यांना अटक होईलच असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अगदी ठामपणे सांगितलं आहे. अनिल परबांवर ईडीकडून कारवाई सुरु झाल्यानंतर सोमय्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

दापोलीत रिसॉर्ट बांधताना अनिल परब यांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. तसेच यामध्ये काळा पैसा देखील वापरण्यात आला आहे. त्यामुळेच सोमय्यांचा दावा आहे की, अनिल परबांना अटक करण्यात येईल.

किरीट सोमय्या नेमके काय-काय आरोप केले?

'दापोलीला मुरुड गावात अनिल परबने फाइव्ह स्टार रिसॉर्ट बांधला. त्यावर सुनावणी झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये ठाकरे सरकारने लोकांकडे मान्य केलं की, अनिल परबांनी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला. त्याला पाडण्याचा आदेश ठाकरे सरकारने दिला. त्यानंतर आता चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सांगितलं की, अनिल परबला जी मुदत देण्यात आली होती रिसॉर्ट पाडण्याची ती 2 मे 2022 संपली आहे. आता महाराष्ट्र सरकारने रिसॉर्टचं वीज-पाणी बंद केलं पाहिजे.' असं सोमय्या म्हणाले.

bjp leader kirit somaiya said very emphatically shiv sena minister anil parab will be arrested
परिवहन मंत्री अनिल परब हे एका रिसॉर्टमुळे कसे अडकत गेले? वाचा सविस्तर बातमी

'ज्या धाडी घातल्या गेल्या आहेत त्या माझ्या तक्रारीच्या आधारे आहे असं दिसतंय. अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी 25 कोटी रुपये वापरले. हे सगळे पैसे कॅशमध्ये वापरले. 7 कोटी रुपये व्हाइटचे वापरले. पण हे दोन्ही व्यवहार अनिल परबने आपल्या व्यवहारात दाखवलेले नाही.' असं म्हणत सोमय्यांनी अनिल परब यांनी मनी लाँड्रिंग केलं असल्याचा आरोप केला आहे.

'इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली की, अनिल परब हे रिसॉर्टचे मालक आहेत. इलेक्ट्रिक मीटर अनिल परबच्या नावावर आहे. ठाकरे सरकार आल्यानंतर त्याचा प्रॉपर्टी टॅक्स 2019-20 आणि 21 हे अनिल परब भरत आहेत. पण इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली की, 25 कोटीची संपत्ती माझी आहे असं दाखवतात. पण कुठेही ही प्रॉपर्टी दाखवलेली नाही.' असे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले आहेत.

'मला विश्वास आहे की, अनिल परबचा रिसॉर्ट पुढे बेनामी म्हणून घोषित केला जाणार. या रिसॉर्टसाठी काळ्या पैशाचा उपयोग झाला. पर्यावरण मंत्रालयाने याप्रकरणी फौजदारी प्रक्रिया सुरु केली. दापोली कोर्टात तक्रार दोन महिन्यापूर्वी तक्रार करण्यात आली. त्याच्याआधारे आता ईडी कारवाई करत आहे.' असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

'या रिसॉर्टसाठी जे 25 कोटी रुपये आले आहेत तो क्राइम मनी आहे. तो पैसा कुठला आहे.. तो पैसा बजरंग खरमाटेकडून आला आहे की, तो पैसा पोलिसांच्या बदल्यांचा आहे, की हा पैसा सचिन वाझेने दिलेला पैसा आहे? याचं शोधकार्य ईडीला करावं लागेल.' अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केली आहे.

'म्हणून एका बाजूला अनिल परबवर 2 मे 2017 रोजी 1 कोटी 10 लाखात ही शेतकी जमीन म्हणून विभास साठेकडून अनिल परबकडून विकत घेतली. ही संपत्ती विकत घेताना जो करार करण्यात आला त्यात ही जमीन सीआरझेड अंतर्गत आहे हे लिहलं आहे करारामध्ये. पश्चिमेला अरबी समुद्र किनारा.. म्हणजे बांधकाम होऊ शकत नाही.' सोमय्या म्हणाले.

'विभास साठेने 2015 साली एनसाठी अर्ज केला होता. जो रद्द करण्यात आला होता. म्हणून अनिल परबने कागदपत्रात खाडाखोड केली. खोट्या पद्धतीने NA मिळवलं. त्याच्याविरोधात देखील फौजदारी कारवाई करण्याचा लोकायुक्ताकडे आदेश देण्यात आला आहे.' असे आरोपी किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

'मला विश्वास आहे की, अनिल परबने जेवढे गुन्हे केले आहेत त्यासाठी त्याला अटक व्हायलाच हवी. अटक होणारच. सगळ्यात मोठी बाब म्हणजे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब.' अशी मागणीही सोमय्यांनी केली.

'उद्धव साहेब कोव्हिडमध्ये तुम्ही आणि तुमच्या माफिया सेनेने कमाईच केली. उद्धव ठाकरेंना एवढं ऐकायला येत नाही का? की, अनिल परबने रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेज पॉवर कनेक्शन 23 मार्च 2020 ला घेतलं. ज्या दिवशी पंतप्रधानांनी 100 टक्के लॉकडाऊन घोषित केलं त्यादिवशी तुमचं विधी मंत्रालय त्याला कनेक्शन देतं.' असं म्हणत किरीट सोमय्यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला.

'मला खात्री आहे की, अनिल परबला अटक होणार. सहा एजन्सीतर्फे अनिल परबवर कारवाई व्हायला हवी आणि होणार.' असं म्हणत किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in