'मला नाही जमलं कधी पैसे खाऊ घालणारे लोकं सांभाळणं', गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?

'मला नाही जमलं कधी पैसे खाऊ घालणारे लोकं सांभाळणं' असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधकांवर जबरदस्त निशाणा साधला आहे. पाहा गोपीनाथ गडावरुन नेमक काय म्हणाल्या पंकजा मुंडे.
'मला नाही जमलं कधी पैसे खाऊ घालणारे लोकं सांभाळणं', गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?
bjp leader pankaja munde indirect criticism of the opposition(फोटो सौजन्य: Facebook)

बीड: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधकांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

'मला नाही जमलं कधी पैसे खाऊ घालणारे लोकं सांभाळणं', असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधला. आता पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पाहा पंकजा मुंडे भाषणात नेमकं काय-काय म्हणाल्या:

'हा गोपीनाथ गड मी माझ्यासाठी नाही तर या लोकांसाठी उभारला आहे. जे आज सकाळपासून तुमची वाट पाहत होते. यांना त्या व्यक्तीला पाहायचं होतं. ज्याचा मुंडे साहेबांशी स्नेह होता. जो गरीब-वंचितांचं काम करतो. कोणता मुख्यमंत्री असेल जो स्वत:च्या हाताने कन्या पूजन करत असेल. तुमचा साधेपणा आम्हा सगळ्यांना खूप आवडली. त्यामुळे शिवराजजी आजपासून तुमचं आणि आमचं एक नातं तयार झालं आहे.' असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

'मध्यप्रदेशची मी प्रभारी असेन किंवा नसेन पण तुमचं-आमचं नातं आयुष्यभर राहिल. मी काय बोलणार याकडे सगळ्या मीडियाचं लक्ष लागून राहिलं आहे. फक्त आजचा दिवस आमच्यासाठी चांगला नाही. या दिवसाच्या आठवणी आमच्यासाठी चांगल्या नाहीत.'

'रामायण, महाभारत यातून आपण काय घेणार आहोत?, रामायण सांगतं धर्म आणि महाभारत सांगतं कर्म. धर्म म्हणजे हिंदू-मुसलमान नसून धर्म म्हणजे मानवता धर्म आहे. जे मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवलंय. आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण बघितलं. त्यांनी सांगितलं की, आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही तर त्यांच्या बरोबर आहोत. असे वाद आपल्याला मिटवायचे आहेत.' असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं

'धर्माने कुणी वाईट वागत असेल तर कितीही कर्म चांगले केले तरी चालणार नाही. अधर्म करुन तुम्ही चांगलं काम करतील, तुम्ही पूल, बंधारे, रस्ते बांधाल. त्यात कार्यकर्त्यांना तुम्ही पैसे खायला कुरण सोडून द्याल. असं नाही अपेक्षित आहे राजकारण्यांकडून. कर्म आणि धर्म एकत्र जपला गेला पाहिजे.'

'जीवन जगताना सत्व, तत्व आणि ममत्व या तीन सूत्रांवर माझं जीवन आहे. सत्व राजकारणात पाहिजे. कोणी किती मला वेड्यात काढलं.. ताई तुम्हाला हे जमलंच नाही. मला त्याचं कधीही वाईट वाटत नाही. मला नाही जमलं कधी कुणाचं हृदय तोडणं, मला नाही जमलं कधी पैसे खाऊ घालणारे लोकं सांभाळणं. मला जमलं ते सामान्य नागरिकांशी नाळ जोडणं.' असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्या विरोधकांवर थेट निशाणा साधला.

'मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे ममत्वामुळेच इथे आले आहेत. दु:खाच्या दिवशीही त्यामुळे मी आनंदी झाले झाले आहे. मी त्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी लाभो, अशा प्रकारची प्रेरणा लाभो की, आमच्या शिवराजजींचं त्यांनी कुठे तरी अनुकरण करुन या महाराष्ट्रातील समस्त ओबीसींवर आलेल्या संकटापासून त्यांना बाहेर काढावं.' अशी मागणी यावेळी पंकजा मुंडेंनी केली आहे.

bjp leader pankaja munde indirect criticism of the opposition
Pankaja Munde म्हणतात "मी पदासाठी वाट..." विधानपरिषद उमेदवारीवरून मोठं वक्तव्य

'बाकी तुम्ही माझी चिंता करु नका.. सगळे मला विचारतात की, तुमचं काय भविष्य आहे?, उद्या काय होणार आहे. तुम्हाला काय मिळणार आहे? याची मला खरंच चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत.' असं म्हणत आपण यापुढेही संघर्ष करतच राहणार असल्याचं पंकजा मुंडेंनी संकेत दिले आहेत.

'माझ्या पराभवाचंसुद्धा सोनं करता याच्या एवढी पुण्याई कोणाकडे आहे? हा पराभव मला दिल्लीपर्यंत, शिवराजींसारख्या सरळ स्वभावाच्या एवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला खूप शिकवून गेला. संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. सोसेल तुमचे वर्मी घाव, कधी मी घायाळ होणार नाही.' असा इशाराच पंकजा मुंडेंनी आपल्या विरोधकांना दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in