'मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार...'; अनिल बोंडेंच्या ट्विटने चर्चांना उधाण

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
'मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार...'; अनिल बोंडेंच्या ट्विटने चर्चांना उधाण
Legislative Council ElectionsMumbai Tak

मुंबई: विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास ७० आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाच्या धामधुमीत भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी सुचक ट्विट केले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी एक संजय जाणार असे वक्तव्य केले होते आणि त्या निवडणुकीत संजय पवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे बोंडेच्या या ट्विटला महत्त्व प्राप्त झाले आहे.

''काळ आला होता भाऊ किंवा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा...'' अशा आशयाचं ट्विट अनिल बोंडेंनी केले आहे. आता हा मिशीवाला मावळा कोण? अनिल बोंडेंचा रोख कोणाकडे आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

अनिल बोंडेंच्या (Anil Bonde) ट्विटला महत्त्व

अनिल बोंडेंनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याचे भाकीत केले असावे. कारण दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार उभे केल्याने कोणत्या तरी एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. आता तो कोणाचा हे निकालानंतर स्पष्ट होईल. अशातच अनिल बोंडेंनी केलेल्या या ट्विटला अधिकचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी हे उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप हे उमेदवार आहेत. आमदारांचे संख्याबळ पाहता काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत होण्याची चिन्ह आहेत. भाई जगताप यांना विजयासाठी आठ मतांची गरज आहे तर भाजपच्या प्रसाद लाड यांना तब्बल २२ मतांची गरज आहे, त्यामुळे एका कोणत्यातरी उमेदवाराचा कार्यक्रम नक्की होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तडजोड करावी लागणार आहे. काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे किंवा भाई जगताप यांपैकी एकाचा पराभव होणार आहे. त्याचबरोबर आमश्या पाडवी किंवा सचिन अहिर यांचा राजकीय बळी जाणार असंच काहीसं बोंडेंना आपल्या ट्विटमधून म्हणायचं असावं. आता सात वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in