'फ्रेंड्स ऑफ बीजेपी ते युवा वॉरिअर्स'; भाजपची 'मिशन 2024' साठी खास स्ट्रॅटजी

bjp strategy for mission 2024 : नवमतदारांपासून ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची विशेष योजना
bjp strategy for Lok sabha and assembly election 2024
bjp strategy for Lok sabha and assembly election 2024

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. निवडणुकीला अवकाश असला, तरी भाजपनं मिशन निश्चित केलंय आणि ते साध्य करण्यासाठी कामही सुरू केलंय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 45 जागा, तर विधानसभेत 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष भाजपचं आहे. त्यासाठी भाजपकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खास योजना तयार करण्यात आल्यात.

भाजपनं नव मतदारांपासून ते वयोवृद्ध मतदारांना भाजपकडे आणण्यासाठी खास स्ट्रेटजी तयार केलीये. तीन योजना आखण्यात आल्या आहेत. यात धन्यवाद मोदीजी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी आणि युवा वॉरिअर्स अशा तीन वेगवेगळी अभियानं राज्यात राबवली जाणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली स्ट्रेटजी : काय आहे धन्यवाद मोदीजी योजना?

रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या तिन्ही अभियानांची माहिती दिलीये. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी भाजपनं एक योजना तयार केलीये. या 'धन्यवाद मोदीजी', अशा लाईनवर लाभार्थ्यांनी पंतप्रधानांना पोस्टकार्ड पाठवण्याचं आवाहन केलं जाणार आहे. बावनकुळे यांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रात केंद्राच्या योजनांचे पाच कोटी 65 लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी दोन कोटी लाभार्थ्यांनी फेब्रुवारी 2023 पर्यंत पत्र पाठवण्यासाठी भाजपकडून काम केलं जाणार आहे.

Loksabha 2024 : फ्रेंड्स ऑफ बीजेपी

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की, 'भाजपवर प्रेम करणारा असा एक वर्ग आहे, जो संघटनात्मक कार्यात येऊ शकत नाही. काही वर्ग असा आहे की सेवेतून निवृत्त झालाय, पण पक्षीय कार्यात सहभागी नाही. मग यात डॉक्टर, वकील, साहित्यिक, एक बौद्धिक वर्ग आहे. जो भाजपचा मतदार आहे. हा वर्ग रोजच्या कार्यक्रमात येत नाही. त्यांच्यासाठी 'फ्रेंडस ऑफ बीजेपी' असं अभियान करणार आहोत."

"मोबाईल नंबरवर त्यांनी मिस्ड कॉल दिल्यानंतर त्यांना लिंक जाईल आणि त्या लिंकच्या माध्यमातून त्यांनी नाव आणि पत्ता भरला की त्यांना स्मार्ट कार्ड पाठवलं जाईल. तसेच गाडीसाठी फ्रेंडस ऑफ बीजेपी असं स्टिकरही जाईल. त्याचबरोबर त्या व्यक्तीपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती पोहोचवू", अशी ही योजना असणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.

तरुण मतदारांसाठी भाजपचं 'युवा वॉरिअर्स'

"नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा असणारा एक युवा वर्ग आहे. 18 ते 25 वर्ष वयोगटातील असा एक युवक वर्ग आहे, ज्याला भाजपसोबत काम करायचं आहे. ज्याप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून युवक काम करत असतात. त्या युवकांना युवा वॉरिअर्स असं आम्ही एक व्यासपीठ खुलं करून दिलंय. परवा आम्ही साताऱ्यात युवा वॉरिअर्सची शाखा सुरू केलीये", अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीये.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in