'भाजपला सरकार पाडण्यात यश मिळणार नाही', राष्ट्रवादी नेत्याचा दावा

ही सगळी खेळी भाजपची आहे. पण भाजपला सरकार पाडण्यात यश मिळणार नाही. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी केला आहे.
bjp will not succeed in overthrowing the government claims the ncp leader
bjp will not succeed in overthrowing the government claims the ncp leader

डोंबिवली: शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ही भाजपची खेळी असल्याचं सांगत भाजपला लक्ष केलं आहे.

ही सगळी खेळी भाजप छुप्या पद्धतीने खेळत आहे. जिकडे त्यांचं सरकार आहे, तिकडेच विमान घेवून जातात. त्यांच्याच पोलीस संरक्षणात आमदाराना घेवून जातात. आसामला स्पेशल फ्लाईटने घेवून जातात, केंद्रीय सुरक्षा दलाच्या गराडा त्या ठिकाणी आणि पोलिसांच्या दबावामध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच कुठेतरी भारतीय संविधानाची पायमल्ली करायची ही भाजपची भूमिका आहे. त्याच भूमिकेतून या आमदारांचे अपहरण केलं असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला.

महेश तपासे आज (22 जून) डोंबिवली येथील पालिका मुख्यालयातील पत्रकार पक्षात आले होते त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपला लक्ष केलं. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबाबत नाराजी व्यक्त केली याबाबत बोलताना तपासे म्हणाले, '2019 मध्ये महाविकास आघाडी झाली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच अजेंडा होता. त्यानुसार अडीच वर्ष सरकार चाललं. दोन वर्ष कोरोनाध्ये गेली. या अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी विविध योजना व आमदारांना भरघोस निधी दिला. त्यामुळे कुणावर अन्याय झाला अशी परिस्थिती नाही.'

'जो पेच प्रसंग निर्माण झाला आहे तो अंतर्गत विषय असला तरी तो मार्गी लागेल. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे निष्ठावान नेते आहेत. ते पुन्हा येतील.' पुढे बोलताना तपासे म्हणाले, 'यांनी भाजपसोबत जर सत्ता स्थापन करायची असती तर ती 2019 साली झाली असती. भाजपने ठाकरे यांना दिलेला शब्द फिरवला त्यानंतर महविकास आघाडी सरकार स्थापन झालं.'

शिवसेना प्रमुख पदावर यावी अशी भाजपची आजही इच्छा नाही, ही सगळी खेळी भाजप छुप्या पद्धतीने खेळत आहे. जिकडे त्यांचं सरकार आहे तिकडेच विमान घेवून जातात. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गराडा त्या ठिकाणी आणि पोलिसांच्या दबावामध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच कुठेतरी भारतीय संविधानाची पायमल्ली करायची ही भाजपची भूमिका आहे. त्याच भूमिकेतून या आमदारांचे अपहरण केलं असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

bjp will not succeed in overthrowing the government claims the ncp leader
एकनाथ शिंदेंचं थेट 'मातोश्री'ला चॅलेंज! शिवसेनेचा व्हीप ठरवला अवैध, केली मोठी घोषणा

काल दिल्लीतील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली हा विषय शिवसेनेने हाताळावा. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. काँगेसची देखील हीच भूमिका आहे. भाजपच्या या प्रयत्नाला यश मिळणार नाही. भाजपच डाव उलटून पडेल. गेलेले सर्व आमदार पुन्हा स्वघरी येतील. अशी अपेक्षा महेश तपासेंनी व्यक्त केली आहे.

सरकार अजिबात डळमळीत झालेलं नाही. जे लोकं नाराज होऊन गेले असतील ते पुन्हा परततील. शिवसेना त्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपाला सरकार पाडण्यात यश मिळणार नाही. असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in