BMC Election : मुंबई महापालिका वार्डनिहाय आरक्षण जाहीर; कुणाचा पत्ता झाला कट?

bmc election 2022 bmc ward reservation : 236 वार्डांसाठी आरक्षण सोडत
BMC Election : मुंबई महापालिका वार्डनिहाय आरक्षण जाहीर; कुणाचा पत्ता झाला कट?
Mumbai municipal corporation election ward reservation 2022India Today, इंडिया टुडे

सर्वाचं लक्ष असलेल्या बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे वार्डनिहाय आरक्षण आज जाहीर झाले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. अनेक वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे.

ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची चिन्हं होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला. आज (३१ मे) मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं. यात आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नगरसेवकांना आपले वार्ड गमवावे लागेल आहेत.

जाणून घ्या कोणकोणत्या वॉर्डात आरक्षण?

निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेच्या आरक्षित आणि अनारक्षित वॉर्डांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २७,५५, ९५, ९८, १११, १२१, १२४, १२६, १२९, १३७, १४५, १४६, १४७, १५०, १५१, १५२, १५४, १५५, १५६, १५९, १६०, १७५, १७९, १८७, १८९, १९२, १९५, २०२, २०३, २०६, २०७, २१८, २२४ व २३४ हे वार्ड २००७, २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. हे वार्ड आता वगळण्यात आले आहेत.

प्रभाग क्रमांक ६०, ८५, १०७, ११९, १३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५ व २२१ हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. या प्रभागांपैकी २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी कोणताही प्रभाग आरक्षित नव्हता.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होत असल्यानं ते आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत होती.

अनुसूचित जाती महिला प्रवर्गाला सुटलेले वार्ड- प्रभाग क्र. १३९, १९०, १९४, १६५, १०७, ८५, ११९, २०४.

अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सुटलेला वार्ड- प्रभाग क्र. १२४.

महिला सर्वसाधारण वार्ड - ४४, १०२, ७९, ११, ५०, ५३, १५४, १५५, ७५, १६०, ८१, ८८, १३७, २१७, १३०, २३२.

या नगरसेवकांचा वार्ड झाला आरक्षित

मुंबई महापालिकेसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नगरसेवकांना त्यांचे वार्ड गमवावे लागले आहेत. यात शिवसेनेचे नेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांचा वार्ड (११७) महिला प्रवर्गाला सुटला आहे. त्याचबरोबर माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही वार्डही सर्वसाधारण महिलेला सुटला आहे.

त्याचबरोबर शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले, काँग्रेस नेते आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि बेस्टचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांनीही वार्ड गमावला आहे.

अमेय घोले, रवी राजा आणि प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे, तर आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड अनुसूचित वर्गासाठी आरक्षित झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in